नागपूर मनपा प्रभाग रचनेवर सुनावणी; कुठे वस्ती, कुठे सीमारेषा चुकल्या, नावे शोधायची कशी?

नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) प्रभाग रचनेवर सोमवारी हरकती मांडण्यात आल्या. 132 पैकी 109 हरकतींवर सुनावणी झाली. आक्षेप नोंदविणारे 23 जण अनुपस्थित होते. प्रत्यक वस्तीचा प्रभागात समावेश झाला. पण, काही वस्त्यांची नावेच गायब आहेत. कुठे वस्ती तर कुठे सीमारेषा चुकल्या आहेत.

नागपूर मनपा प्रभाग रचनेवर सुनावणी; कुठे वस्ती, कुठे सीमारेषा चुकल्या, नावे शोधायची कशी?
जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेताना प्रशासकीय अधिकारी.
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 10:50 AM

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आलाय. यंदा तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे जुन्या प्रभागांत थोडाफार बदल करण्यात आलाय. एका प्रभागातील भाग दुसऱ्या प्रभागात गेलाय. या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार 132 आक्षेप आलेय. भाजप, काँग्रेससह ( BJP, Congress) अनेक पक्षांच्या इच्छूक उमेदवारांनी आक्षेप नोंदवले होते. नागपूर प्रभाग प्रारूप आराखड्यावर 109 आक्षेपांवर जिल्हाधिकारी कार्यालयात ( Collector Office) सुनावणी झाली. यासाठी वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी (b. Venugopal Reddy) यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केलीय. त्यांच्या समोर प्रभाग रचनेवरील आक्षेपांवर सुनावणी झाल्याची माहिती जय विदर्भ पार्टीच्या ईच्छुक उमेदवार ज्योती खांडेकर यांनी, तसेच मतदार सुशील चंदवाणी यांनी सांगितलं.

23 जण सुनावणीसाठी आलेच नाही

एक फेब्रुवारी रोजी निवडणुकीसाठी प्रभागाची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 156 सदस्यांकरिता 52 प्रभागाचे प्रारूप नकाशे जाहीर करण्यात आलेत. नव्या प्रभाग रचनेवर 132 हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगातर्फे नियुक्त प्रधान सचिव (वने) बी. वेणुगोपाळ रेड्डी यांनी 109 हरकती व सूचनांवर सुनावणी घेतली. परंतु 23 जण सुनावणीसाठी आलेच नाही. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगरे-वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

स्किनवर प्रभागाची रचना दाखविली

स्क्रिनवर प्रभागाची प्रारूप रचना दाखवून, प्रभागांच्या सीमा व अन्य माहिती दाखवून सुनावणी घेण्यात आली. आक्षेपांमध्ये प्रभाग 34 मध्ये गैरसोयीच्या वस्त्यांचा समावेश करण्यात आला. कामकाजाच्या दृष्टीने सोयीच्या वस्त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना राजेश कुंभलकर व मनोज साबळे यांनी केली. शिवसेनेचे शहर अध्यक्ष सिद्धेश्‍वर कोमजवार व दीपक कापसे यांनी प्रभाग 47 संदर्भात असाचा आक्षेप नोंदविला. प्रभाग 29 व 48 यांनी पुनर्रचना करताना शासन निकषाचे पालन केले नसल्याचा आक्षेप नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी नोंदविला. प्रभाग 34 मधील रामबाग कॉलनी, रामबाग ले-आऊट अशा परिचित व अधिक लोकसंख्या असलेल्या वस्त्यांची नावे नसल्याचा आक्षेप जॉन थॉमस यांनी नोंदविला. या सुनावणीवेळी आक्षेप नोंदविणारे २३ जण अनुपस्थित होते.

पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून शारीरिक संबंध हे क्रौर्यच, नागपूर कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

नागपूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर, कसा येणार आणि जाणार मिनी मंत्रालयाचा पैसा?

बुलडाण्यात सुसाट स्कूल बसची कामगाराला धडक, बसच्या मागच्या चाकाखाली येऊन डोकचं फुटलं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.