Heat wave in Vidarbha : विदर्भात उष्णतेची लाट; पुढील दोन दिवसांत तापमान 45 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा अंदाज
विदर्भात उष्णतेची लाट (Heat wave) आल्याचे पहायला मिळत असून, तापमान (Temperature) पुढील दोन दिवसांत 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नागपूरचा (NAGPUR) पारा 43.3 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे.
नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट (Heat wave) आल्याचे पहायला मिळत असून, तापमान (Temperature) पुढील दोन दिवसांत 45 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नागपूरचा (NAGPUR) पारा 43.3 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. विदर्भात उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता असते. मात्र यंदा सरासरीपेक्षाही अधिक तापमानाची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सरासरी तापमानात 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. दरम्यान दुसरीकडे चंद्रपूरमध्ये देखील पारा 44.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तापमान वाढतच असल्याने विदर्भात अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडण्याचा सल्ला देण्यत आला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस विदर्भातील तापमान वाढतेच राहणार असून, ते 45 अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र दोन दिवसानंतर विभागात पावसाची शक्यता असून, पाऊस पडल्यास काही प्रमाणात उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.
तापमान वाढले
यंदा विदर्भातच नव्हे तर राज्यभरातील तापमानात वाढ झाली आहे. राज्यात उष्णतेची लाट आहे. विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. नागपूरचे तापमान 43.3 अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चंद्रपूरमध्ये देखील रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपुरात पारा 44.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. काही दिवसांपासून सरासरी तापमानात तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होऊ शकते, तापमान 45 अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा अंदाज हवानामन खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पावसाचा अंदाज
दरम्यान दोन दिवसानंतर विदर्भात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पाऊस पडल्यास नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळू शकते. मात्र या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा फळ बागा, आंब्याच्या बागा आणि इतर पिकांना बसू शकतो. विदर्भातील काही भागांमध्ये पाणीटंचाई देखील जाणवू लागली आहे.
इतर बातम्या
Nagpur Murder : नागपूरमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची अल्पवयीन मुलीच्या मदतीने हत्या
Nagpur Theft : सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करुन लुटणारी टोळी जेरबंद, लुटलेला मुद्देमाल जप्त