Heavy rainfall: विदर्भ मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा, पूरस्थिती नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 14 पथके तैनात

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने बुधवारी व गुरुवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.

Heavy rainfall: विदर्भ मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा, पूरस्थिती नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 14 पथके तैनात
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:32 AM

नागपूर, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने बुधवारी व गुरुवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला (Marathwada and Vidarbha) विजांच्या कडकडाटासह पावसाचा (Heavy rainfall) इशारा दिला आहे. राज्यात पूरस्थिती नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 14 पथके तैनात करण्यात आली आहेत. यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मुंबईत 2, पालघर 1, रायगड 2, ठाणे 2, रत्नागिरी 2, कोल्हापूर 2, सातारा 1, एनडीआरएफ, अशी एकूण 12 पथके तैनात आहेत. तर नांदेड 1, गडचिरोली 1, अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईसह कोकणातील 4 व विदर्भातील 10, अशा 14 जिल्ह्यांत 4 दिवस म्हणजे 29 जुलेंपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

27 जुलैला सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात माध्यम पाऊस होऊ शकतो.

28 जुलैला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली भागात मुसळधार पासून होऊ शकतो

27 आणि 28 जुलैला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पासून झाला. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्याच्या कमलादेखील वेग आला आहे. विदर्भात माध्यम स्वरूपाचा पाऊस शेतकऱ्यांना अपेक्षित आहे, मात्र हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे माराधवध अजूनही तहानलेलाच आहे. जुलै महिन्याचा शेवट असूनही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.