नागपुरात व्हीव्हीआयपींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर; फुटाळा तलावाजवळ बघ्यांची का होतेय गर्दी?
नागपुरात एमआय एट हेलिकॉप्टर फुटाळा चौपाटीवर आले आहे. हे हेलिकॉप्टर 1980 मध्ये सोवियत युनियनने बनविले होते. 2020 पर्यंत वायुदलाच्या सेवेत होते. फुटाळा चौपाटीच्या सौंदर्यात भर घालत आहे.
नागपूर : कारगील युद्धाबरोबरच तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि तत्कालीत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सेवेतील भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर आता फुटाळा चौपाटीचं सौंदर्य वाढवणार आहे. एम आय सेव्हन हेलिकॉप्टर फुटाळा परिसरात ठेवण्यात आलंय. 2020 पर्यंत ते हे हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेच्या सेवेत होतं. जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या हेलिकॉप्टरमध्ये एमआय एटचा समावेश आहे. आता हे हेलिकॉप्टर फुटाळा चौपाटीवर बसवण्यात आलंय. त्यामुळे हेलिकॉप्टर बघणारे आता फुटाळा चौपाटी परिसरात यायला लागलेत.
आपातकालीन व्यवस्थापनात मदत
संबंधित हेलिकॉप्टर वायूसेनानगर एअरफोर्स स्टेशनमध्ये ठेवले होते. तिथून ते महामेट्रोला देण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी फुटाळा तलावाच्या काठावर आणण्यात आले. हे हेलिकॉप्टर आठ फुटांच्या प्लाटफार्मवर बसविण्यात आले आहे. 2020 पर्यंत हे हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेच्या सेवेत होते. सोव्हिएय युनियनमध्ये तयार करण्यात आले होते. राष्ट्रपती, पंतप्रधान अशा व्हीव्हीआयपींच्या उड्डाणासाठी या हेलिकॉप्टरचा वापर होत होता. भारतीय वायुदलाकडे 107 एमआय एट हेलिकॉपर्टस होते. प्रताप असे नाव या हेलिकॉप्टरला दिले गेले होते. पूर तसेच आपातकालिन व्यवस्थेतही या हेलिकॉप्टरचा वापर केला गेलाय.
विशेष मोहिमांसाठी हेलिकॉप्टरचा वापर
या हेलिकॉप्टरमध्ये चार टन माल वाहून नेण्याची क्षमता आहे. शौचालयाचीही याठिकाणी सुविधा आहे. भारतीय वायुदलाने दोन हेलिकॉप्टर सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यासाठी दिली आहेत. एक नागपूरमध्ये, तर दुसरा चंदिगडमध्ये ठेवण्यात आला. साठहून अधिक देश या हेलिकॉप्टरचा वापर करतात. हे सर्वाधिक उत्पादित केले जाणारे विमान आहे. वायूदलाच्या विशेष मोहिमेसाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता. सियाचेन ग्लेशियरमधील ऑपरेशन मेघदूत तसेच श्रीलंकेतील ऑपरेशन पवनमध्ये या हेलिकॉप्टरने महत्त्वाची भूमिका बजावली होती.