VIDEO – हिंगणघाट जळीतकांड प्रकरण : 426 पानांचे दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्ष आणि मृत्यूच्या तारखेच्या एक दिवस अगोदर निकाल!…

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आता 9 फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. 3 फेब्रुवारी 2020 ला आरोपी विकेश नगराळे याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटविले होते. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता.

VIDEO - हिंगणघाट जळीतकांड प्रकरण : 426 पानांचे दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्ष आणि मृत्यूच्या तारखेच्या एक दिवस अगोदर निकाल!...
हिंगणघाट येथील न्यायालय.
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 4:38 PM

वर्धा : राज्यात खळबळ माजवणाऱ्या हिंगणघाट येथील जळीतकांड (Hinganghat arson incident) प्रकरणाचा निकाल 9 फेब्रुवारीला लागणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजच्या केवळ 19 दिवसांतच 426 पानांचे दोषारोपपत्र (426-page indictment)दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात एकूण 64 सुनावणी घेत 29 साक्षदारांचे प्रत्यक्ष बयान (Eyewitness testimony of 29 witnesses) नोंदविण्यात आले आहे. घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला 10 फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. 9 फेब्रुवारीला निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आल्याने अंकिताच्या मृत्यूला 2 वर्षे पूर्ण होताना हा निकाल लागणार असल्याचे दिसते. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पेट्रोल ओतून पेटविले

मृतक अंकिता ही हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. यामध्ये पीडिता 3 फेब्रुवारीला 2020 ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरून बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील पेट्रोल काढलेली पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवून टाकले. यात गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत नागपुरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय शुक्रवार 28 फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते.

विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून उज्वल निकम

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने पीडितेची बाजू मांडण्याकरिता विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केली. प्रकरणाची पहिली सुनावणी 4 मार्च 2020 रोजी हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायलयात झाली. आतापर्यंत न्यायालयाने 64 सुनावणी घेतली आहे. 64 तारखापैकी 34 तारखेला न्यायालयात ऍड. उज्ज्वल निकम सरकारी पक्षातर्फे न्यायालयात हजर होते तर अॅड. दीपक वैद्य हे प्रत्येक सुनावणीत सरकारतर्फे उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांकडे एकूण 77 साक्षदार होते त्यापैकी 29 साक्षदारांची साक्ष न्यायलयात नोंदविण्यात आलीय, अशी माहिती अॅड. सरकारी वकील दीपक वैद्य यांनी दिली. या प्रकरणात घटनास्थळी असलेल्या साक्षदाराने न्यायालयात सरकारची बाजू भक्कमपणे मांडल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. आता न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती

Tadoba Tiger | कोंडेगावात अवतरले वाघोबा; ग्रामस्थांनीच बदलला मार्ग, जंगलाबाहेर येण्याचे कारण काय?

मेळघाटातील बालमृत्यूची धक्कादायक आकडेवारी; सहा महिन्यांत पंधरा मातांच्याही मृत्यूची नोंद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.