Nagpur Thalassemia | नागपुरातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू, राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस

एनएचआरसीने स्वत:हून गंभीर दखल घेतली. सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच चौकशीअंती दोषी आढळणार्‍यावर कारवाई होईल. मृत बालकाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई संदर्भात काय कारवाई केली? याबाबतही एचएचआरसीने खुलासा मागितला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागपूरला आले असताना दिले होते.

Nagpur Thalassemia | नागपुरातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू, राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस
नागपुरातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू,
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 4:34 PM

नागपूर : नागपुरातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं (National Human Rights Commission) राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठविली. नागपुरातील चार थॅलेसेमियाग्रस्त मुलांना एचआयव्हीची लागण झाली. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुख्य सचिव आणि अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) विभागाच्या सचिवाला नोटीस बजावली. सहा आठवड्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मुलांना दूषित रक्तातून एचआयव्ही ते संक्रमण झाल्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये चार थैलेसेमिया मुलांना रक्तसंक्रमणानंतर एचआयव्हीची बाधा झाली. यामध्ये चारपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. ही सर्व बालके दहा वर्षे वयोगटाच्या आतील आहेत. नागपुरातील डॉ. विंकी रुग्वानी ( Dr. Vinky Rugwani) यांच्याकडे या बालकांचे नियमित रक्त बदलविले जात होते. या बालकांना नेमक्या कोणत्या रक्तपेढीतून रक्त चढवण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळं शहरातील कोणत्या रक्तपेढीत एचआयव्हीबाधित रक्त पुरवठा झाला याची स्पष्टता नाही.

चौकशीसाठी समितीची स्थापना

नागपुरातील एचआयव्हीबाधित चार बालकांपैकी एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. याप्रकरणी राज्याचे आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक आर. के. धकाते यांनी गुरुवारी 26 मे रोजी समिती स्थापन करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. नागपुरातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये न्यूक्लिक अॅसिड चाचणी (नॅट) होत नाही. त्यामुळे एचआयव्ही किंवा त्याप्रकारच्या संक्रमणाबाबत माहिती कळू शकत नाही.

एनएचआरसीकडून गंभीर दखल

आधी थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या पाच बालकांना हिपॅटायटीस सीची लागण झाली. दोन बालकांना हेपेटायटीस बीची लागण झाल्याचेही समोर आले. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची एनएचआरसीने स्वत:हून गंभीर दखल घेतली. सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच चौकशीअंती दोषी आढळणार्‍यावर कारवाई होईल. मृत बालकाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई संदर्भात काय कारवाई केली? याबाबतही एचएचआरसीने खुलासा मागितला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागपूरला आले असताना दिले होते.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.