Corona Positive MLA | कोरोना पॉझिटिव्ह आमदार आंदोलनात कसे?; हे तर सुपर स्प्रेडर, काँग्रेसचं भाजपावर टीकास्त्र

आमदार कृष्णा खोपडे हे पाच दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतरही त्यांनी सहाव्या दिवशी आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळं हे तर सुपरस्प्रेडर असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

Corona Positive MLA | कोरोना पॉझिटिव्ह आमदार आंदोलनात कसे?; हे तर सुपर स्प्रेडर, काँग्रेसचं भाजपावर टीकास्त्र
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 11:36 AM

नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी पाच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर टाकले होते की, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. हा कोर्स सात दिवसांचा आहे. तुमच्या दृष्टिकोनातून विषय महत्त्वाचा वाटत असेल, तर आंदोलन करावे. पण, अशा पद्धतीनं सुपर स्प्रेडर बनने हे चुकीचे आहे. माझी नागपूर पोलिसांना विनंती आहे की, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा. अशी विनंती काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. नाना पटोले म्हणतात की, त्या गावगुंडाला अटक केलेली आहे. पण, अद्याप पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं नाही. पण, गावगुंड मोदी आहे. गावगुंड मोदीला पोलिसांनी बोलावलं होतं. त्याचा २०२० चा रेकार्ड आहे. त्यामुळं आता भाजपला विचार करायचा आहे की, गुंड मोदींना सपोर्ट करायचा की, नाही, असंही अतुल लोंढे यांचं म्हणणं आहे. उमेश घरडे ऊर्फ मोदी असं स्वतःला तो म्हणतो. हाच तो गावगुंड असं लोंढे यांनी स्पष्ट केलं.

खोपडे म्हणतात, मला कोणतीही लक्षणे नव्हती

आमदार कृष्णा खोपडे म्हणतात, मी बारा जानेवारीला पॉझिटिव्ह आलो. त्यानंतर पाच दिवस आपल्या घरी होतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं. मला सुरवातीपासूनच मला कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. सर्दी नाही, खोकला नाही. ताप नाही. तर मी बाहेर निघू शकतो का? आरोग्य अधिकारी म्हणाले, पॉझिटिव्ह आल्यापासून तीन दिवस काहीच लक्षणे नसतील, तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्यामुळं मी आजच्या कार्यक्रमाला गेलो, असे स्पष्टीकरण आमदार कृष्णा खोपडे यांनी दिले. पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्यानंतर गर्दीतून जाणं आमदारांना कितीपत योग्य वाटलं, हे तेच जाणोत. खरं तर नवीन गाईडलाईन्सनुसार, सात दिवस गृहविलगीकरणात राहणे आवश्यक आहे.

कोणत्या आंदोलनात झाले सहभागी

मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पूर्व नागपुरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे विलगीकरण सोडून सहभागी झाले. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Nagpur Crime | क्रिकेटच्या सट्ट्याने केला घात! जुगाऱ्याने अख्खं कुटुंबच संपवलं; नागपुरात नेमकं काय घडलं?

Nagpur Ghatrona | वेकोलिच्या स्फोटांमुळं घरांना तडे!, घाटरोना गावाचे पुनर्वसन होणार काय?

NMC Election | नागपुरात आप कुणाचा वाढविणार ताप; मनपा निवडणुकीत पहिल्यांदाच अजमावणार जोर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.