माय-लेकीच्या ब्रेक द बायससाठी मॅरेथॉन, नागपुरात किती समुदाय धावणार?

मॅरेथॉन स्पर्धेत शाळेमधील 8, 9 व 11 व्या वर्गातील फक्त मुली व त्यांच्या माता सहभागी होतील. तसेच महाविद्यालयीन तरुणींनादेखील यामध्ये सहभागी होता येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली. https://forms.gle/aj४DTYYMDhuoULwa6 या लिंक वर सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

माय-लेकीच्या ब्रेक द बायससाठी मॅरेथॉन, नागपुरात किती समुदाय धावणार?
नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 6:13 AM

नागपूर : ब्रेक द बायस (Break the Bias) अर्थात भेदभाव सोडा या संदेशासाठी 13 मार्चला नागपुरात 5 किलोमीटर मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन मोफत नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाने लिंक (District Administration link for registration) जाहीर केली आहे. अधिकाधिक संख्येने घराघरातील मायलेकीने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी आर विमला (Collector R Vimala) यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील लिंक जारी केली आहे. या लिंकवर गेल्यानंतर या स्पर्धेतील आपली नोंदणी होणार आहे. मोठ्या प्रमाणात बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहे. लिंक https://forms.gle/aj४DTYYMDhuoULwa6 अशी आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा संविधान चौकातून आरंभ होईल. विधानभवन रस्त्याने, जपानी गार्डन, वॉकर स्ट्रीट, रामगिरी, जिमखाना व्हीसीए चौक या 5 किलोमीटरच्या मार्गाने होईल. स्पर्धेचा समारोप संविधान चौकात होईल.

स्पर्धा फक्त महिलांसाठी

ब्रेक द बायस, रन फॉर इक्वॅलिटी तसेच वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी सीट बेल्ट व हेल्मेट वापरा. स्पीडवर नियंत्रण ठेवा या संदेशासह रन फॉर सेफ्टीवर आधारित फक्त महिलांसाठी ही स्पर्धा असेल. सकाळी सात ते आठ या कालावधीमध्ये हे आयोजन असेल. मॅरेथॉन स्पर्धेत शाळेमधील 8, 9 व 11 व्या वर्गातील फक्त मुली व त्यांच्या माता सहभागी होतील. तसेच महाविद्यालयीन तरुणींनादेखील यामध्ये सहभागी होता येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली. https://forms.gle/aj४DTYYMDhuoULwa6 या लिंक वर सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जीडीसी परीक्षेसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

सहकार विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी अँड सी.एच.एम परीक्षा 27 ते 29 मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. चालू वर्षात परीक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीने 31 मार्च अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी कळविले आहे. उमेदवारांनी httpd://maharashtra.gdca.gov.in या संकेतस्थळावर 31 मार्च 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, तसेच 4 एप्रिलपर्यंत बँकेमध्ये चलनाने शुल्क जमा करावे. परीक्षार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत अधिसूचना या विभागाच्या https:sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना तयार केलेला स्वत:चा युजर आयडी व पासवर्ड परिक्षार्थींनी परीक्षेचा निकाल प्रसिध्द होईपर्यंत योग्य प्रकारे जतन करुन ठेवणे आवश्यक आहे, असेही प्रसिध्दीपत्रकात नमूद आहे.

Photo – अकोल्यात उभ्या कारला अचानक आग, कार जळून खाक! न्यायालय परिसरातील घटना

Photo – अकोल्यात उभ्या कारला अचानक आग, कार जळून खाक! न्यायालय परिसरातील घटना

Yavatmal | लोहाऱ्याच्या पोलीस ठाण्यात महिलाराज, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली जबाबदारी

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.