Video: ज्या ऑक्सिजनसाठी सगळीकडे मारामारी चाललीय तो नेमका कसा तयार होतो?
ॲाक्सिजन तयार होण्याची प्रक्रिया काय आहे? ऑक्सिजन निर्मितीसाठी रॅा मटेरीयल काय आहे? | Oxygen crisis Maharashtra
नागपूर: देशभर कोरोनाचं मोठं संकट आहे, या संकटात लाखो गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजनची (Oxygen) आवश्यकता आहे. पण सध्या महाराष्ट्रासह देशभर ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक भागात ॲाक्सिजन अभावी हाहाःकार माजलाय. लोकांचे जीव जात आहे. अशा या संकटात अनेकांनी प्रश्न पडते ऑक्सिजन नेमकं तयार कसं होतं? ॲाक्सिजन तयार होण्याची प्रक्रिया काय आहे? ऑक्सिजन निर्मितीसाठी रॅा मटेरीयल काय आहे? असे अनेक प्रश्न पडतात. (how oxygen is made from air)
कसा तयार होतो ऑक्सिजन?
ऑक्सिजन तयार करण्यासाठी हवा हेच रॉ मटेरियल आहे. सर्वप्रथम हवेतील ऑक्सिजन शोषून घेतला जातो. त्यानंतर या ऑक्सिजनला कॉम्प्रेस केले जाते. यानंतर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत ऑक्सिजन आणि नायट्रोजन वेगवेगळे केले जातात. त्यानंतर काही प्रक्रिया करुन लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर्समध्ये भरला जातो. नागपूरमध्ये सध्या दोन प्रकल्पांमध्ये ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. या प्रकल्पांमध्ये दिवसाला साधारण 150 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते.
तुम्ही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण राज्याला ऑक्सिजन पुरवठा करा; हायकोर्टाने केंद्र सरकारला फटकारले
कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen Shortage) जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला चांगलेच फटकारले. तुम्ही कोणासमोरही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण दिल्लीत कुठूनही ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना अशाप्रकारे मरताना बघू शकत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले. (Delhi HC slams central govt over shortage of oxygen supply in Coronavirus hospitals in Delhi)
यावेळी न्यायालयाने ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या खासगी कंपन्यांनाही खडे बोल सुनावले. देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तब्बल 21.5 लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशावेळी पर्याप्त ऑक्सिजनचा साठा असणे गरजेचे आहे. खासगी कंपन्यांना एवढी हाव सुटली आहे का, त्यांना साधी माणुसकीही दिसत नाही, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने विचारला. संबंधित बातम्या:
Nashik Oxygen Tank Leak Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखापट्टणमला दाखल, ऑक्सिजन भरण्यास 20 तासांचा अवधी लागणार