Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger बल्लारपूरच्या जंगलात कसा झाला वाघिणीचा मृत्यू? चार दिवसांपासून वनविभागाला पत्ताच नाही

विशेष म्हणजे कारवा इथं पर्यटन सुरू करण्यात आलं आहे. पर्यटक जात असलेल्या भागात वर्दळ असते. तरीसुद्धा चार दिवसांनंतर वाघिणीच्या मृत्यूची बाब उघडकीस आली आहे. नेहमी गस्तीवर राहणारे वनविभागाचे कर्मचारी काय करत होते, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Tiger बल्लारपूरच्या जंगलात कसा झाला वाघिणीचा मृत्यू? चार दिवसांपासून वनविभागाला पत्ताच नाही
प्रातिनिधिक चित्र
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 7:12 PM

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूरच्या कारवा जंगलात पाच वर्षीय वाघिणीचा मृतदेह सापडला. चार दिवसांपूर्वीच ही वाघीण मृत झाल्याचं सांगितलं जातं. चार दिवसांनंतर वनविभागाला गस्तीदरम्यान याची माहिती मिळाली. वाघिणीचे अवयव सुरक्षित असल्यानं विषबाधेची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पर्यटन सुरू असलेल्या भागातच मृत्यू

विशेष म्हणजे कारवा इथं पर्यटन सुरू करण्यात आलं आहे. पर्यटक जात असलेल्या भागात वर्दळ असते. तरीसुद्धा चार दिवसांनंतर वाघिणीच्या मृत्यूची बाब उघडकीस आली आहे. नेहमी गस्तीवर राहणारे वनविभागाचे कर्मचारी काय करत होते, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारवा 1 बिटातील कक्ष क्रमांक 500 मधील ही घटना आज सकाळी उघडकीस आली. त्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करण्यात आलं. व्हिसेराचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेत. वनरोपवाटिकेत वाघिणीचा मृतदेह जाळण्यात आला.

फास असलेल्या वाघिणीला शोधण्यात वनविभाग अपयशी

ही घटना आहे वरोरा रेंजमधील सालोरीच्या जंगलातील. २६ मे २०२१ रोजी वाघिणीच्या गळ्यात वायरचा फास अडकला. शिकारी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी अशाप्रकारचा फास लावत असतात. या फासामुळं वाघीण जखमी झाल्याचं दिसून आलं. वाघीण या जखमेमुळं रक्तबंबाळ झाली. विशेष म्हणजे त्यावेळी ती वाघीण गरोदर होती. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी कामाला लागले. चंद्रपूर वनविभागाकडून १८० कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. गळ्याला गंभीर जखम झाली आणि त्यातून रक्त वाहत असल्याचे अनेकदा आढळून आले.

१४ जुलैच्या सुमारात या वाघिणीने चार पिल्लांना जन्म दिल्याची माहिती आहे. ही पिल्ले आता चार महिन्यांची झालीत. तरीही वाघिणीची तिच्या फासातून सुटका करण्यात आली नाही. वाघिणीची जखमरी आता सुकत (वाळत) आहे. ही समाधानाची बाब असली, तरी पुन्हा ती एखाद्या झुडपात अडकल्यास तिचे बरेवाईट होऊ शकते. वाघिणीची फासातून लवकरच सुटका करण्यात येईल, असा अाशावाद व्यक्त करण्यापलीकडं वनअधिकारी काही सांगू शकत नाहीत. वाघिणीला बेशुद्ध करून तिचा फास काढला जाईल, एवढेच आश्वासन वनअधिकारी देतात.

विद्यार्थ्यांचा वाहतूक खर्च वाढणार, जाणून घ्या कारण काय?

Nagpur हवाला व्यापाऱ्यांवर सर्जीकल स्ट्राईक, 84 लाखांची रोकड कुठून केली जप्त?

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....