ऑनलाईन परीक्षेत कॉपी कशी करायची, याचे धडे देणारे व्हिडीओ व्हायरल, या सायबर गुन्हेगारीवर आळा कसा बसणार?
नागपूर विद्यापीठाच्या ॲानलाईन परिक्षा खरंच पारदर्शक आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होतोय (how to copy in online exam of Nagpur university video viral on social media).
नागपूर : कोरोनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची सध्या ॲानलाईन परिक्षा सुरु आहे. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नागपूर विद्यापीठाच्या ॲानलाईन परीक्षेत चिटिंग कशी करायची? याचे धडे देणारे व्हिडीओ सध्या सर्रास सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा फैसला करणाऱ्या, नागपूर विद्यापीठाच्या ॲानलाईन परिक्षा खरंच पारदर्शक आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होतोय (how to copy in online exam of Nagpur university video viral on social media).
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर सध्या नागपूर विद्यापीठाच्या ॲानलाईन परिक्षेत कॅापी करण्याचे धडे देणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ॲानलाईन परिक्षा सुरु असताना प्रश्नांची उत्तरं गुगलवर कशी शोधायची, परीक्षेत चिटिंग करताना संगणकाच्या कॅमेऱ्यापासून बचाव कसा करायचा? हा गैरप्रकार करताना तुम्ही पकडले जाणार नाही, याचे काय फंडे आहेत. विद्यापीठाच्या ॲानलाईन परिक्षेत कॅापी करण्याचे धडे देणारे अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ सर्रास व्हायरल होत आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे अशा लिंक 11 हजार लोकांना बघितल्या आहेत. याबबात विद्यापीठ सायबर पोलिसांत तक्रार करणार असल्याचं परिक्षा नियंत्रक सांगतात (how to copy in online exam of Nagpur university video viral on social media).
विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई नाही
नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सध्या अंतिम टप्प्यात आहेत, तर उन्हाळी परीक्षा 29 जूनपासून सुरू होत आहेत. विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने होत असल्याचा दावा केला आहे. मात्र, यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांवर ऑनलाईन परीक्षेत चिटिंग कशी करायची, याचे धडे देणारे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी विद्यापीठाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारांवर कारवाई करायला हवी, अशी मागणी करत याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार, असं सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी सांगीतलं.
विद्यापीठाकडून गैरप्रकार रोखण्यासाठी ‘वेब’ची स्थापना
कोरोनामुळे ॲानलाईन परिक्षा घेण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठाने घेतलाय. ही ॲानलाईन परीक्षा एक तासाची असून, विद्यार्थ्यांना घरी बसून ही परीक्षा द्यावी लागते. विद्यापीठाने यासाठी ‘वेब’ आधारित संकेतस्थळ तयार केलंय. ज्यामध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे संकेतस्थळ सुरू असताना मोबाईल लोकेशन सुरू ठेवावे लागेल. यामुळे विद्यार्थी एकाच ठिकाणावरून परीक्षा देत असेल तर गैरप्रकार होण्याची शक्यता कमी असल्याचा दावा केला जातोय. पण सर्व प्रकारातून वाचून चिटिंग कशी करायची? याचे सर्रास धडे देणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आतापर्यंत 11 ते 12 हजार जणांनी हे व्हिडीओ बघितल्याने आता विद्यापीठाचीही चिंता वाढली आहे.
हेही वाचा : बोअरवेलमध्ये बाळ पडलं, टॉर्च लावून दोरी सोडली, गावकऱ्यांनी अशक्य गोष्ट करुन दाखवली