NMC Budget | नागपूर मनपाचे उत्पन्न कसे वाढणार? आयुक्त राधाकृष्णन यांचा प्लान

नागपूरचे आयुक्त राधाकृष्णन यांनी मनपाचे उत्पन्न कसे वाढेल, यावर भर दिला. जलप्रदाय, नगर रचना, बाजार, स्थावर विभाग यांच्याकडून आर्थिक उत्पन्न कसे मिळेल, यावर भर दिला. तसेच जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कसे मिळविता येतील, याचाही प्लान आयुक्तांना अर्थसंकल्पात केला आहे.

NMC Budget | नागपूर मनपाचे उत्पन्न कसे वाढणार? आयुक्त राधाकृष्णन यांचा प्लान
नागपूर मनपाचा अर्थसंकल्प सादर करताना मनपा आयुक्त. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 8:23 PM

नागपूर : नागपूर मनपाचे प्रशासक आणि आयुक्त राधाकृष्णन बी. (Commissioner Radhakrishnan) यांनी 2022-23 या वर्षाचा प्रस्तावित अंदाजपत्रक आज सादर केला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मनपा आयुक्त यांनी मनपाचे उत्पन्नवाढ (Income Growth) आणि नावीन्यपूर्ण प्रकल्पांवर भर देणारा 2684 कोटींचा उत्पन्न व 2669 कोटीच्या खर्चाचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे उपस्थित होते. आयुक्तांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात एकूण महसुली खर्च 1518 कोटी व भांडवली खर्च 1000 कोटी एवढा आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, आरोग्य, विद्युत, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य (Public Health) अभियांत्रिकी विभाग, माहिती व तंत्रज्ञान या महत्वाच्या विभागांकरिता सर्व विभाग मिळून एकूण महसुली खर्चापेक्षा भांडवली खर्चाची तरतूद जास्त ठेवण्यात आली आहे.

जलप्रदाय विभाग

2021-22 च्या सुधारित वार्षिक अथसंकल्पीय अंदाजानुसार जलप्रदाय विभागापासून 195 कोटी उत्पन्न अपेक्षित होते. त्यापैकी आतापर्यंत 170 कोटी उत्पन्न प्राप्त झाले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता पाणी दरापासून 200 कोटी उत्पन्न प्रस्तावित करण्यात आले आहे.

नगर रचना विभाग

विकास कामांना मंजुरी देताना अकारावयाच्या विकास शुल्कात 10 टक्के वाढ करण्यास शासनाची मंजुरी प्राप्त झाली. विकास शुल्कापासून मिळणा-या रक्कमेतून मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 119 कोटी 75 लाख रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट नगर रचना विभागाकडून ठरविण्यात आले आहे.

बाजार विभाग

सद्यस्थितीत मनपाचे एकूण 68 बाजार आहेत. त्यामध्ये 2692 दुकाने, 956 ओटे व 1177 जागा अस्थायी स्वरूपात वापरात देण्यात आलेले आहेत. मनपाच्या बाजार क्षेत्रातील सायकल/स्कुटर पार्किंग स्टँडपासून मनपाला जवळपास 50 लाख रुपये उत्पन्न प्राप्त होईल. बाजार विभागाकडून 2022-23 या वर्षात 13 कोटी 71 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

स्थावर विभाग

मनपाच्या स्थावर विभागाच्या जागेबाबतच्या सर्व अभिलेखांचे जतन करण्याचे काम 2022-23 या आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. या सर्व अभिलेखांचे डिजिटलायजेशन करणे प्रस्तावित आहे. स्थावर विभागाकडून या आर्थिक वर्षात 6 कोटी 30 लाख उत्पन्न अपेक्षित आहे.

NMC Budget | नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा एका क्लिकवर…

NMC Budget | नागपूर मनपाच्या अर्थसंकल्पात करवाढ नाही, आयुक्तांनी सादर केला 2,669 कोटींचा अर्थसंकल्प

Nagpur ST | 500 एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनासाठी पैसे गोळा केले, अजय गुजर यांच्याकडे जमा केल्याची प्रवीण घुगे यांची माहिती

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.