नागपूर : कुटुंब म्हटलं तर वाद होतच असतात. अशाच प्रकारचा वाद हुडकेश्वर पोलीस (Hudkeshwar police) ठाण्याच्या हद्दीत झाला. नीलेश ठाकूर (Nilesh Thakur) यांचे पत्नीशी भांडण झाले. नेहमीच दोघांचे खटके उडत होते. त्यामुळं पत्नीने घर सोडण्याचा निर्णय (wife decides to leave home) घेतला. ती घराबाहेर निघून गेली. त्यामुळं नीलेशला अतिशय वाईट वाटले. तो चिंता करू लागला. आता घर पत्नीअभावी त्याचं मन रमेना त्यामुळं तो निराशेत होता. अशात त्याच्या मनात आत्महत्येचा विचार डोकाऊ लागला. त्याने विषाची व्यवस्था केली. ते विष घेतले. विषबाधा झाल्याने नीलेशचा मृत्यू झाला.
मृतक नीलेशचा पत्नीशी वाद झाला. या वादात दोघेही चांगलेच भांडले. नेहमीच्या या भांडणामुळं त्याची पत्नीही त्रस्त झाली होती. ती आधी त्याला सोडून जाण्याची धमकी द्यायची. या भांडणानंतर खरोखरचं ती नीलेशला सोडून गेली. या घटनेमुळं नीलेशला अतिशय दुःख झाले. त्यामुळं त्याने जीवनाचा शेवट करायचा कठोर निर्णय घेतला. विष कुठूनतरी आणले. मन कठोर करून ते घेतली. हळूहळू विष त्याच्या शरीरात भिनले. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळं नागपूर हादरलेय. सुखी संसाराची राखरांगोळी कशी होऊ शकते, हे घटनेतून दिसून आले. त्यामुळं संसार सांभाळताना दोघांनाही काहीतरी तडजोड करावी लागते. ती केली नाही, तर अशाप्रकारे सुखी संसाराची राखरांगोळी होते.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक धक्कादायक घटना घडली. अठ्ठावीस वर्षीय महिला ऑटोने प्रवास करत होती. मिलिंद मलकाम या ऑटोचालकाने ऑटोत बसल्यावर विनयभंग केला, अशी तक्रार ठाण्यात नोंदविली. सोमवारी संध्याकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली असं संबंधित महिलेचं म्हणणं आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.