Nagpur जेवणाची चव का बिघडली? पतीने केली पत्नीला मारहाण
अंबाझरी पोलिस ठाणे हद्दीतील फुटाळा चौपाटी, दुर्गा माता मंदिरासमोर हे दाम्पत्य राहते. निधी आकाश गौर (वय २५) यांनी त्यांचे पती आकाश गौर (वय ३२) यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
नागपूर : जेवणाची चव का बिघडली म्हणत पतीनं पत्नीला चांगलीच मारहाण केली. याची तक्रार पत्नीनं अंबाझरी पोलिसांत केली आहे. पतीनं शिवीगाळ केली. शिवाय तोंडावर लात मारल्याचा पत्नीचा आरोप आहे. ही घटना शहरातील अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. आजचे जेवण बिघडले कसे, तुझे स्वयंपाकात लक्ष नसते. असं म्हणत पतीनं मारहाण केल्याची तक्रार पत्नीनं केली आहे. यात तिला दुखापतही झाली. त्यामुळं पतीविरोधात तीनं पोलिसांत तक्रार दाखल केली. 30 नोव्हेंबर रोजी, रात्री 1 वाजता ते 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचं पत्नीचं म्हणण आहे. अंबाझरी पोलिस ठाणे हद्दीतील फुटाळा चौपाटी, दुर्गा माता मंदिरासमोर हे दाम्पत्य राहते. निधी आकाश गौर (वय 25) यांनी त्यांचे पती आकाश गौर (वय 32) यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
दोन बाईक चोरांना अटक, सात दुचाक्या जप्त
नागपूर : जरीपटका पोलिसानी दोन बाईक चोराला अटक केली. त्यांच्याकडून 7 बाईक पोलिसांनी जप्त केल्या. अटक केलेल्या आरोपींपैकी एक नाबालिक आहे. तर एक सराईत गुन्हेगार आहे. बाईक चोरी करण्यात पटाईत असलेला आरोपी जरीपटका पोलिसांच्या हाती लागला. त्याची चौकशी करताच एकूण 7 बाईक त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या. जरीपटका पोलिसांच्या डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यांनी या चोरांना पकडलं. त्यांच्याकडून कोराडी, मानकापूर, जरीपटका आणि सदरमधील चोरी केलेल्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपी हा ताजबाग परिसरातील असून तेजस रामावत असं नाव आहे. दुसरा आरोपी अल्पवयीन आहे.
31 वर्षीय युवतीने घेतले विष
बेसा : रोडवरील नरहरीनगरातील स्वाती श्रीवास या 31 वर्षीय युवतीनं विष प्राशन करून आत्महत्या केली. शहरातील अजनी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. स्वातीनं 9 सप्टेंबर विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 30 नोव्हेंबर रोजी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.