Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC election मीच काँग्रेसचा उमेदवार-छोटू भोयर; उमेदवार बदलाचा प्रस्ताव हायकमांडकडं?

अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देण्यावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं एकमत झाल्याचीही सुत्रांची माहिती आहे. पण छोटू भोयर यांनी या सर्व चर्चेचं खंडण केलंय. मीच काँग्रेसचा उमेदवार असून, उमेदवार बदलाचा कुठलाही प्रस्ताव हायकमांडकडं गेला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

MLC election मीच काँग्रेसचा उमेदवार-छोटू भोयर; उमेदवार बदलाचा प्रस्ताव हायकमांडकडं?
विधान परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना प्रशासकीय कर्मचारी.
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 10:32 AM

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव हायकमांडकडं पाठवल्याची माहिती आहे. त्यामुळं आता दिल्लीच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्याय. छोटू भोयर ताकदीने निवडणूक लढत नसल्यानं उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं काँग्रेसच्या गोटात बोललं जातंय.

अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देण्यावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं एकमत झाल्याचीही सुत्रांची माहिती आहे. पण छोटू भोयर यांनी या सर्व चर्चेचं खंडण केलंय. मीच काँग्रेसचा उमेदवार असून, उमेदवार बदलाचा कुठलाही प्रस्ताव हायकमांडकडं गेला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

विजय काँग्रेसच्या उमेदवाराचा होणार – केदार

नागपूर विधान परिषद निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांना काँग्रेस बदलणार असल्याच्या चर्चेने वातावरण गरम झालं. त्याच अनुषंगाने काँग्रेसने काल हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये मतदारांची बैठक पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत घेतली. त्यांनी आपल्या मतदारांना मार्गदर्शन सुद्धा केलं. कॅमेऱ्यावर तर सुनील केदार या संबंधाने काही बोलले नाही. मात्र त्यांनी आमचा विजय स्पष्ट असल्याचं संकेत देत काँग्रेसमध्ये कुठलीही गटबाजी नसल्याचं त्यांनी सांगितलं.

100 पेक्षा जास्त मतांनी निवडूण येणार-बावनकुळे

सहलीला गेलेले भाजपचे नगरसेवक नागपुरात परतले. भाजपचे सर्व नगरसेवक पेंच येथील रिसॅार्टमध्ये रवाना करण्यात आले. उद्या थेट मतदान केंद्रावर येणार भाजपचे नगरसेवक येणार असल्याची माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 100 पेक्षा जास्त मतांनी निवडणूक जिंकण्याचा दावा केलाय.

15 मतदान केंद्रांवर 560 मतदान करणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी शुक्रवारी, 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी काल निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया व त्यानंतरच्या व्यवस्थेबाबत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेऊन चर्चा केली. बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदान पेट्या बचत भवन येथील स्टॉंगरूम मध्ये ठेवण्यात येणार असल्याने पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बचत भवन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली. या निवडणुकीसाठी नागपूर शहरासह जिल्हयात 15 मतदान केंद्र असून मतदारांची संख्या 560 आहे. यामध्ये महानगरपालिका 155 जिल्हा परिषद 71 व नगरपरिषद आणि नगरपंचायत 334 अशी मतदार संख्या आहे.

तीन उमेदवार, मुख्य लढत भाजप-काँग्रेसमध्ये

नागपूर जिल्हा विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. तीन उमेदवार रिंगणात आहेत. 560 मतदार करणार मतदान करतील. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र (छोटू) भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी 10 डिसेंबरला मतदान व 14 डिसेंबरला स्थानिक प्राधिकारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सर्व मतदान केंद्र तहसील कार्यालयाच्या आसपास असल्यामुळे मतदानाच्या दिवशी 10 डिसेंबरला तहसील कार्यालय नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय, तहसील कार्यालय नरखेड, काटोल, रामटेक, उमरेड, मौदा, पारशिवनी, येथील सेतू केंद्र बंद ठेवली जाणार आहेत नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Nagpur Murder | रिलेशनशीपनंतर लग्नाला नकार, प्रियकराने मॉलमध्ये भेटायला बोलवून प्रेयसीचा गळा आवळला

Nagpur bus | महिन्याभरानंतर धावल्या आठ एसटी बस; तपासणी अधिकारी-वाहतूक नियंत्रक झाले चालक-वाहक

Nagpur cat | मांजरीचा वावर जीवावर उठला, कीटकनाशकाचा डबा सांडवला, विष चाटल्यानं बाळाचा मृत्यू

'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.