नागपूर : मी जेव्हा मत मागायला फिरायचो तेव्हा लोक सांगायची आमचा मुलगा पुण्यात शिकतो. कोणी म्हणायचं मुंबईला म्हणून मी विचार केला नागपुरात शिक्षणाच हब (Education Hub in Nagpur) बनवायचं. नागपूर दोन भागात विभागाला आहे एक रेल्वे पुलाच्या इकडे आणि एक तिकडं. पूर्व नागपूर मागास होत म्हणून या ठिकाणी सिम्बॉयसिस (Symbiosis) आणायचं ठरवलं. या ठिकाणी आज स्कील डेव्हलपमेंटच्या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, मी देशाचा नेता असलो तरी नागपूर माझं आहे. नागपूरमुळे मी नेता आहे. म्हणून नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना 25 टक्के फी कमी ठेवण्याचा आग्रह केला. नागपूरचं सिम्बॉयसिस सगळ्यात सुंदर आहे. इथे आल्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये आल्यासारखं वाटते. कारण याठिकाणचं डिझाईन आणि डेकोरेशन (Design and Decoration) तसं करण्यात आलंय.
आता साई (स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचं) काम सुद्धा सिम्बॉयसिसच्या बाजूलाच सुरू झालं. त्यामुळे आता या भागाचा मोठा विकास होणार आहे. इथं जागेचा योग्य वापर झाला नसता तर इथे झोपडे निर्माण झाले असते. त्याला नितीन नगर , देवेंद्र नगर अशी नाव लागली असती. कारण हे जास्त प्रमाणात होत असतं. पश्चिम नागपुरात अधिकारी राहतात. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, पूर्व नागपुरात झाले पाहिजे. ही 75 एकर जागेत युनिव्हर्सिटी आणायचं ठरलं. टेंडरचं अध्ययन केलं. तांत्रिक विद्यापीठाला जागा देण्याचं ठरलं. 25 टक्के जागा नागपूरसाठी राखीव ठेवली. मुलांना 15 टक्के शुल्कास सवलत. आता सिमेंटचा रोड, लाईट आहेत. डिझायनिंगचा प्रश्न होता. पुण्यात मुजुमदार यांनी प्रेझेंटेशन दाखविलं. कॅम्पस सुंदर आहेत. नागपूरचा सर्वात सुंदर कॅम्पस आहे. व्हाईट हाऊसमध्ये आल्यासारखं वाटतं. हाफीज भाई डिझाईन काढलं.
Inaugurating Convention Centre and Centre for Skill Development at Symbiosis Institute, Nagpur https://t.co/ceNHR1IaKG
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 27, 2022
40 टक्के जागा स्पोर्स्टकरिता आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर बिल्डिंग तयार झाल्या. काँक्रिट टेक्नॉलॉजी उद् घाटन करायला गेलो होतो. विश्वनाथन सुंदर डिझाईन केलं. स्कील डेव्हलपमेंट आवश्यक आहे. स्वयंरोजगार प्राप्त करून देणार आहोत. पूर्व नागपुरातील मुलं इथं शिकतात. नागपूरची पिढी घडेल. साईचं कंपाउंड वॉल तयार होत आहे. पारडी ते जयप्रकाशनगर इलेक्ट्रिकवर चालणारी बस धावणार आहे. भांडेवाडीला रुफ टॉप सोलर तयार करण्याचा प्रोजेक्ट. पाण्यापासून ग्रीन हायट्रोजन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही गडकरी यांनी सांगितलं. अडीच कोटीत डेफेन्सची जागा घेतली. नऊ वर्षांपूर्वी डिझाईन तयार केली. आठ वर्षे घालविलं. लंडन स्टीट एवजी आरेंज स्टीट असं नाव ठेवलं. अडीच कोटीची जागा घेतली. अडीच हजार कोटी रुपये मिळतील, .याची आठवण गडकरींनी सांगितली.