नागपूर : कलाकारांनी सुंदर मूर्ती बनविल्या. आपल्या कामाची क्वालिटी (Quality) चांगली असेल तर त्याची मागणी वाढते. निशुल्क किंवा कमी पैशात मूर्तीकारांना (sculpture) कच्चा माल कसा मिळेल, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. मूर्ती चांगल्या भावात विकल्या गेल्या तर मूर्तीकारांना चार पैसे मिळतील. विदर्भ (Vidarbha) साहित्य पर्यावरण स्नेही गणेश मूर्तीकार स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, 2 हजार 400 कोटी नागनदी स्वच्छतेसाठी खर्च करतो आहोत. मात्र त्याच प्रदूषणं थांबलं पाहिजे. हे प्रदूषण थांबविण्यासाठी प्रदूषण मंडळाने प्रदूषण करणाऱ्यांना नोटीस द्याव्या. जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण मुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.
प्रदूषण मंडळ आणि महापालिकेने प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करत प्रत्येकाला आपल्या घरात ऑरगॅनिक खत तयार करण्याबाबत माहिती द्यावी. त्याचा फायदा होईल. यापुढे आपण मातीच्याच मूर्ती बनवू असा संकल्प करूया. चांगली मूर्ती तयार करू. येत्या गणेशोत्सवात मूर्तीकारांच्या मूर्तीचं प्रदर्शन भरवा. उत्तम आणि चांगल्या क्वालिटीच्या मूर्ती हव्यात. चांगला भाव मिळाल्यास कलाकारांना वाव मिळेल. गरज पडल्यास मनपावर कारवाई करा. नाग नदीचं दूषित पाणी गोसेखुर्दमध्ये जाता कामा नये, असंही नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, ऑर्गानिक वेस्टपासून घरी खत तयार करतो. बालकनीत भाजीपाला लागवड केली आहे. दोन ऑक्टोबरला ही बाब मी अमिताभ बच्चन यांना सांगितली होती. त्यांनीही किचन गार्डनचा प्रयोग केला. ऑर्गानिक खत तयार केलं. त्यांच्याकडंही किचन गार्डन तयार झालं. अमिताभ एकदा म्हणाले, गडकरीजी तुम्ही सांगितलेलं किचन गार्डन तयार केलं. ऑर्गानिक खत तयार केलं. तिथंली भाजी खाऊन तुमची आठवण करतो. इतर लोकंही ऑर्गनिक वेस्टचं खत घरीच तयार करू शकतो. प्रत्येक घरी एक संत्र्याचं झाड लागलं पाहिजे, असा प्रयोग झाला पाहिजे. घर, प्लाट आहे, त्यानं एक संत्र्याचं झाडं सांभाळायचं. एक परिवार एक झाडं लावल्यास जनतेचा सहभाग हवा, असंही त्यांनी सांगितलं.