दीक्षाभूमी स्मारक समितीत … लोकांचा कारभार, आनंदराज आंबेडकरांचा आंदोलनाचा इशारा का?
त्यांनी म्हटलं बाबा होतं की, बाबासाहेबांनी इच्छा नसताना बुद्ध धर्म स्वीकारला.
सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकासाठी दिलेली जागा ‘बुद्धिस्ट सोसायटी (Buddhist Society) ऑफ इंडियाला’ देण्यात आली होती. आताच्या दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये मनुवादी विचारांच्या लोकांचा कारभार सुरू आहे. त्यामुळं दीक्षाभूमी स्मारक समितीचे अधिकार बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे पुन्हा सुपूर्द करण्यात यावेत. यासाठी आंदोलन करणार असल्याची भूमिका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी मांडली. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास आठवले यांचं नाव न घेता तो राजकारणातील जोकर माणूस आहे. त्यांनी म्हटलं बाबा होतं की, बाबासाहेबांनी इच्छा नसताना बुद्ध धर्म स्वीकारला. अशी टीका आनंदराज आंबेडकरांनी केली.
ब्राम्हणांनी पापक्षालन करावं, असं मोहन भागवत यांनी म्हंटलं होतं. यावरून आरएसएस ही फक्त आणि फक्त ब्राम्हणांचं संघटन आहे, हे अप्रत्येक्ष कबूल केलं. त्यांनी हे वक्तव्य यासाठी केलं की, मोठ्या प्रमाणात लोक बुद्ध धर्माकडे वळत आहेत, असंही आनंदराज आंबेडकर म्हणाले.
महापालिका आणि जिल्हा परिषद शाळा टक्केवारी कमी होत आहेत. त्यामुळं त्या शाळा बंद केल्या जात आहेत. त्या करू नये त्यासाठी दिल्लीप्रमाणे काम करावं. दिवाळी भेट देणार असं सरकार म्हणते. ते फक्त घोषणा न करता प्रत्येक्षात द्यावं, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
हिंदुत्वाच्या नावावर काही दिवसच राजकारण होऊ शकते. त्यामुळे रोजगाराच्या बाबतीत सरकारने विचार करावा. उद्योग बाहेर जाऊ नये, यासाठी प्रयत्न करावा, असंही ते म्हणाले.
2024 ची निवडणूक आम्ही ताकतीने लढू. देशात सध्याचं सरकार यंत्रणांवर नियंत्रण ठेवत आहे. हे आता कागदपत्र न तपासता शिवसेने संदर्भात घेतलेल्या निर्णयावरून दिसून येते, असंही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं.