Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर जिल्ह्यात 70 टक्के लोकांनी घेतले लसीकरणाचे दोन्ही डोस, तरीही गेल्या 24 तासांत 5 मृत्यू, आणखी कोरोना अपडेट काय?

राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार लशींचा दुसरा डोस टक्केवारी 70 टक्के पूर्ण करणारा जिल्हा परिशिष्ट ‘अ’मध्ये येत आहे. निर्बंध शिथिल करण्यात येतात. त्यासाठी नागपूर जिल्ह्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय.

नागपूर जिल्ह्यात 70 टक्के लोकांनी घेतले लसीकरणाचे दोन्ही डोस, तरीही गेल्या 24 तासांत 5 मृत्यू, आणखी कोरोना अपडेट काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 2:27 PM

नागपूर : जिल्ह्यात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 70 टक्के पूर्ण झालीय. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना (Relief and Rehabilitation Department) पाठविलाय. हा प्रस्ताव मान्य झाल्यास नागपूर जिल्ह्यातील वेळेची बंधने हटणार आहेत. राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार लशींचा दुसरा डोस टक्केवारी 70 टक्के पूर्ण करणारा जिल्हा परिशिष्ट ‘अ’मध्ये येत आहे. निर्बंध शिथिल करण्यात येतात. त्यासाठी नागपूर जिल्ह्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून लसीकरणाची टक्केवारी पहिला डोस घेणारे 99 टक्के आणि दुसरा डोस घेणारे 70 टक्के झालेय. त्यासोबतंच कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी (Positivity) दर 7 टक्क्यांपेक्षा खाली आलाय. त्यामुळे जिल्हाधिकारी आर विमला (Collector R Vimala) यांनी निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. येत्या सोमवारपासून नागपुरातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

गेल्या चोवीस तासात पाच बळी

गुरुवारी शहरातून 1 हजार 526, ग्रामीणमधून 771 व जिल्ह्याबाहेरील 21 असे 2318 जण ठणठणीत बरे झाले. जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 5 लाख 54 हजार 806 वर गेली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.54 टक्क्यांवर आले आहे. बाधितांची संख्या घटत आहे. कोरोनामुळे दगावणार्‍यांच्या संख्येत चढ-उतार कायमच आहे. गुरुवारी शहरातील तीन व जिल्ह्याबाहेरील दोन अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 10 हजार 310 वर गेली आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात 8293 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी 6.63 टक्के म्हणजेच 549 जणांचे अहवाल सकारात्मक आढळले.

जिल्ह्यात 82 ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढली

शहरात 5 हजार 96, ग्रामीणमध्ये 4 हजार 89 व जिल्ह्याबाहेरील 415 असे 9 हजार 600 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 89.67 टक्के म्हणजेच 8 हजार 608 जणांना लक्षणेच नसल्याने ते गृहविलगीकरणात आहेत. ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने बाधितांची संख्या जिल्ह्यात वाढली. गुरुवारी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून 82 जणांचे अहवाल ओमिक्रॉन सकारात्मक आढळले. यातील बहुतांशी रुग्ण ठणठणीत बरे झालेत.

गोंदियात धावती ट्रेन पकडता पकडता तोल सुटला; महिला पडणार एवढ्यात जवान आला मदतीला धावून…

Nagpur NMC | मनपाच्या स्थायी समितीकडून यंदाही करवाढ नाही, प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला

Nagpur Crime | एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले; चाकूच्या धाकावर 58 वर्षीय महिलेवर दोघांकडून बलात्कार, नागपुरात चाललंय काय?

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.