Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यात आज फेरफार अदालत; कुठे करता येणार शेती-मालमत्तेची फेरफार?

शेती, मालमत्तेसंदर्भातील फेरफार तातडीने निकाली निघावेत, यासाठी महाराजस्व अभियानाअंतर्गत बुधवारी, 9 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यात आज फेरफार अदालत; कुठे करता येणार शेती-मालमत्तेची फेरफार?
नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 1:38 PM

नागपूर : एप्रिल 2016 पासून ऑनलाईन ई-फेरफार सुविधा (Online e-modification feature) प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जनतेच्या तक्रारी राहू नये, अशी व्यवस्था ग्रामपातळीवर शासनाने केली आहे. तरीदेखील फेरफार संदर्भात सामान्य नागरिकांच्या काही तक्रारी आहेत. त्या सोडवण्याची फेरफार अदालत ही संधी आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी (By the Collector) केले आहे. उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी बुधवारी फेरफार अदालतीची पाहणी तालुकास्तरावर जाऊन करणार (Will go to taluka level) आहेत. एक महिन्याच्या वर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यात येतील. त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे, शासन निर्णयानुसार आवश्यक आहे. एका महिन्याच्यावर फेरफार प्रलंबित असल्यास मंडळ स्तरावर अदालतीचे आयोजन करणे आवश्यक असते. त्यासाठीचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मंडल स्तरावरही फेरफार होणार

प्रत्येक तहसील ठिकाणी बुधवारी ही अदालत आयोजित करण्यात आली आहे. काही ठिकाणी मंडळ स्तरावरही आयोजनाची निर्देश देण्यात आले आहे. शासकीय निर्णयानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी सकाळी दहा ते पाच या कालावधीत फेरफार अदालतीचे आयोजन करणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे. यामध्ये फेरफार अदालतीच्या दिवशी प्रलंबित फेरफार नोंदीच्या संदर्भात अर्जदार व हरकतदार यांना आवश्यक त्या पुराव्यासह उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. बुधवारी अर्जदार व हरकतदार यांच्या उपस्थितीत प्रलंबित फेरफार उपलब्‍ध अभिलेख यावरून नियमानुसार असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच दिवशी प्रमाणित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे.

दुचाकी वाहन क्रमांकांची सिरीज बदलणार

दुचाकी वाहनांची सध्या सुरू असलेली MH49-BT ही संगणकीय वाहन नोंदणी मालिका संपत आली आहे. दोन फेब्रुवारीपर्यंत या सिरीजमध्ये MH49-BT-9836 या क्रमांकापर्यंत वाटप झालेले आहे. त्यामुळे आता MH49-BU ही नवीन सिरीज वाहन नोंदणीत सुरू करण्यात येत आहे. नवीन सिरीज सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. नागपूरकरांनी याचा लाभ घ्यावा, असे सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी निनाद सुर्वे यांनी आवाहन केले आहे.

नागपूर शहरातील भोसलेकालीन सर्व विहिरींचे संवर्धन होणार; महापालिकेची नेमकी योजना काय?

Nagpur | धोकादायक विजेचा शॉक! गेल्या बत्तीस महिन्यांत 547 जणांना गमवावे लागले प्राण, किती जनावरांचा झाला मृत्यू?

Nagpur Crime | नागपुरात गेस्ट हाऊसमध्ये जुगाराचा डाव, पोलिसांच्या छाप्यात सापडलं काय?

पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.
जामीन मिळताच प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना
जामीन मिळताच प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना.
पुणे गर्भवती मृत्यूप्रकरणी भिसे कुटुंबाकडून 5 मागण्या, सर्वात पहिले...
पुणे गर्भवती मृत्यूप्रकरणी भिसे कुटुंबाकडून 5 मागण्या, सर्वात पहिले....
रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा
रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंकडे गेलं नाहीतर..शिंदेंच्या MLA चा इशारा.
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा
.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु, प्रकाश आंबेडकरांचा.
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका.
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले.