Nagpur Heatstroke | नागपुरात गेल्या 8 दिवसांपासून तापमान 44-45 डिग्रीपर्यंत, शहरात 3 दिवसांत 4 जण बेशुद्धावस्थेत सापडले, उष्माघाताचे बळी असण्याची शक्यता
सदर ठाण्याअंतर्गत छावणी बस स्टँडजवळ 8 जून रोजी 45 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध सापडला. रुग्णालयात दाखल केले असता त्यांनाही डॉक्टरांनी मृत जाहीर केले. अशीच घटना अजनी पोलीस हद्दीतही घडली. टीबी वॉर्ड परिसरात 37 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध पडला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
नागपूर : नागपुरातलं तापमान काही कमी होताना दिसत नाही. गेल्या आठ दिवसांत 44 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस तापमान कायम आहे. त्यामुळं या तापमानामुळं नागरिक हैराण झाले आहेत. उखाड्यानं जीव गेल्यासारखं वाटत आहे. अशात नागपुरात गेल्या तीन दिवसांत चार लोकं रस्त्यावर बेशुद्ध (Unconscious) अवस्थेत सापडलेत. या बेशुद्ध अवस्थेतील नागरिकांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी (Doctor) घोषीत केलं. हे मृत्यू कशाचे याच कारण स्पष्ट नाही. मात्र, उन्हान नागपूरकरांना गेल्या आठवड्यात चांगलंच हैराण केलं. घरात राहूनही घामाच्या धारा वाहत आहेत. घराबाहेर पडल्यास उखळल्यागत वाटतं. रस्त्यावर काम करणाऱ्यांचं तर काही खरं नाही. तीन दिवसांत बळी गेलेले लोकं हे रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडलेत. त्यामुळं हे उष्माघाताचे बळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
3 दिवसांत नेमकं काय घडलं
6, 7 आणि 8 जून रोजी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी हे चार मृतदेह सापडलेत. 6 जून रोजी 50 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध सापडला. तो गणेशपेठ पोलीस हद्दीतील अशोक चौकात. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. 7 जून रोजी 50 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध पडले होते ते गड्डीगोदाम येथे. हा भाग सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. सदर ठाण्याअंतर्गत छावणी बस स्टँडजवळ 8 जून रोजी 45 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध सापडला. रुग्णालयात दाखल केले असता त्यांनाही डॉक्टरांनी मृत जाहीर केले. अशीच घटना अजनी पोलीस हद्दीतही घडली. टीबी वॉर्ड परिसरात 37 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध पडला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
कसा राहणार पुढचा आठवडा
नागपुरात काल 44.4 अंश डिग्री तापमान होतं. पुढील आठवड्यात तापमानात घट होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळलेलं राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यातलं तापमान 45.6 अंश डिग्री सेल्सिअस होतं. गोंदियातील नागरिकही या वाढत्या तापमानानं परेशान झाले आहेत. मृत नक्षत्र केव्हा कोसळणार, याची प्रतीक्षा पाहत आहेत. वर्धा जिल्ह्याते तापमानही काल 45 अंश डिग्री सेल्सिअस होतं. चंद्रपुरातला पारा 45.2 अंश डिग्री सेल्सिअस होता. पण, पुढील आठवड्यात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळलेलं राहणार असल्यानं या तापमानापासून हळूहळू मुक्ती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.