नागपूर : युवा सेनेने विदर्भकडे लक्ष केंद्रित करत नागपुरात युवा सेनेचा निश्चय मेळावा (Nishchay Melawa) युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारलाय. युवा सेनेला विद्यापीठातील सिनेट निवडणुकांचा टार्गेट देण्यात आलंय. युवा सेनेची फौज तयार करा त्यासाठी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आखणार असल्याचे संकेत दिले. नागपूरसह विदर्भात शिवसेना आणि युवा सेनेचं पाहिजे त्या प्रमाणात प्रस्थ नाही. मात्र आता युवा सेना कामाला लागली आहे. नागपुरात भरगच्च असा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून युवा सेनेत जोश फुंकण्याचं काम वरुण सरदेसाई यांनी केलं. मुंबई विद्यापीठात ज्याप्रमाणं युवा सेनेने इतिहास रचला, तोच इतिहास आता विदर्भातील विद्यापीठात (University of Vidarbha) रचायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागा अशा सूचना करण्यात आल्या. राज्यभरात युवा सेनेची फौज तयार करण्यासाठी राज्य स्तरावर सदस्य नोंदणी ( Member Registration) कार्यक्रम राबविण्यास लवकरच सुरवात करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. अनेक निवडणूक आपण युतीत भाजपसोबत होतो म्हणून गांभिर्याने घेतल्या नाही. पण आता आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळ्या निवडणुका आपल्याला गांभिर्यानं घ्यायच्या आहेत.
वरुण सरदेसाई म्हणाले, भाजपला देशात एकहाती सत्ता मिळाली. तेव्हा आपण सोबत होतो. मात्र आता त्या पक्षाने विकास तर काय काहीच केलं नाही. मात्र ते काही अजेंडा राबवतात, असा टोला भाजपला लगावला. महाविकास आघाडी सरकारने चांगलं काम केलं याचा दाखला अनेक एजन्सींनी ने दिलं. सर्वात चांगले मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं नाव पुढं आलंय. मुख्यमंत्री सहायता निधी सगळ्या पक्षांनी दिला. मात्र भाजपने तो निधी राज्य सरकारकडे न करता पीएम सहायता निधीमध्ये दिला. असं हे महाराष्ट्रद्रोही आहेत. महागाई विरोधात काँग्रेसच्या काळात भाजप नेते रस्त्यावर उतरत होते. मात्र आता शांत बसले. केंद्र सरकार अपयशी ठरलं.
संजय राऊत यांचा गुन्हा काय हे कोणालाच सांगता येत नाही. मी सांगतो त्यांचा गुन्हा काय. संजय राऊत यांनी भाजप चे 105 घरी बसवले. हा गुन्हा केला म्हणून त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली. आदित्य ठाकरे एवढ्या कमी वयात कॅबिनेट मंत्री म्हणून जे काम करत आहे त्याचं कौतुक आंतरराष्ट्रीय स्थरावर होत आहे. युवकांची मोठी फौज उभी करायची आहे. त्यासाठी राज्य स्थरीय सदस्य नोंदणी करायची आहे, असंही सरदेसाई यांनी यावेळी सांगितलं.