Video : Nagpur MP Sports Festival | नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन, 16 दिवस चालणार स्पर्धा; 40 मैदानांवर आयोजन

आधी माझं वजन 135 किलो होतं आता मात्र 93 किलो आहे. मला त्यामुळं मला चांगलं वाटायला लागलं. नागपूर शहरात दोनशेच्यावर खेळाची मैदान तयार करण्यात आली आहे, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

Video : Nagpur MP Sports Festival | नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन, 16 दिवस चालणार स्पर्धा; 40 मैदानांवर आयोजन
नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटनImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 1:53 PM

नागपूर : नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं (MP Sports Festival) आयोजन करण्यात आलंय. याच उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रसिद्ध हॉकीपटू धनराज पिल्ले ( Hockey Player Dhanraj Pillay) यांच्या हस्ते करण्यात आलं. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे. 16 दिवस चालणार हे आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलंय. मागील वर्षी कोविडमुळं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. मात्र, यावेळी असं आयोजन करण्यात आलं. वेगवेगळ्या 40 मैदानांवर हे आयोजन करण्यात आलंय. यामध्ये देशातील वेगवेगळ्या भागातील खेळाडू सहभागी होणार आहे.

पाहा व्हिडीओ

नागपूर शहरात दोनशे खेळाची मैदानं

यावेळी बोलताना गडकरी यांनी सांगितलं की, खेळ हा जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे. माझं काम रस्ते बनवण्याचा असलं तरी खेळाडू घडवणंसुद्धा मला आवडतं. खेळासोबतच व्यायानमाला आणि योगासन यालासुद्धा जीवनात मोठे महत्त्व आहे. मी पण लहानपणी क्रिकेट खेळत होतो. क्रिकेट मॅचेस पाहायला जायचो. त्यामुळं मला यात मोठी रुची आहे. योगासन किती फायदे होतात, हे मी अनुभवलेलं आहे. आधी माझं वजन 135 किलो होतं आता मात्र 93 किलो आहे. मला त्यामुळं मला चांगलं वाटायला लागलं. नागपूर शहरात दोनशेच्यावर खेळाची मैदान तयार करण्यात आली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मेहनत करण्याची तयारी हवी

प्रसिद्ध हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी आपले अनुभव सांगताना मी अतिशय गरीब घराण्यातून आलो आहे. एका काळात मी पण तुमच्याप्रमाणे समोर बसून मोठ्या खेळाडूंची भाषण ऐकत होतो. मेहनत, खेळावर असलेला प्रेम आणि देश प्रेम आपल्यामध्ये असायला पाहिजे. तरच आपण मोठा खेळाडू बनू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन या ठिकाणी होत आहे. खेळाडूंच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. मेहनत करण्याची तयारी हवी. देशाप्रती प्रेम हवं, असंही पिल्ले यांनी सांगितलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.