Agrovision | केंद्रीय कृषिमंत्री म्हणतात, खासगी गुंतवणूक वाढविणे आव्हानात्मक; शेतीतील असंतुलन कसे होणार दूर?
सीमन आधी दीडशे रुपयांत मिळत होते, ते 80 रुपयांत मिळते. विदर्भात रोज 50 लाख लीटर दूध व्हावं, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
नागपूर : कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. तोमर म्हणाले, शेतीतील असंतुलन दूर करण्याची गरज आहे. त्याचं मार्गदर्शन या कृषी प्रदर्शनात मिळत आहे. कृषी उत्पादनामध्ये आम्ही नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवर आहोत. इतर क्षेत्रात खाजगी गुंतवणूक झाली आणि त्याचा फायदा झाला.
मात्र कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणूक झाली नाही. फक्त सरकारी गुंतवणुकीवर आहे. त्यामुळं विकास पाहिजे तो झाला नाही. आता पंतप्रधान यांनी अनेक सुरवात केली. मात्र खाजगी गुंतवणूक अजूनही कमी आहे. आम्ही कृषी कायदे केले होते. मात्र ते काहींना पसंद आले नाही. त्यामुळं रद्द करावे लागले. मात्र हरकत नाही आम्ही पुढे जात राहू. शेतकऱ्याला मजबूत करू असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलं.
गीर गायीची बेटी बचाओ अभियान
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गवतापासून मिथेन तयार करता येतो. त्यापासून इथेनॉल तयार होतो. ग्रीन हायट्रोजन फरिदाबादमध्ये तयार होत आहे. सिमेंट प्लांट, रेल्वे, ट्रकसाठी ग्रीन हायट्रोजन तयार करा. रेडिओ अग्रोव्हीजन, कृषी कल्याण टीव्ही, डेअरीमध्ये खूप मोठं काम झालंय. 10 कोटी लेबारेटरीसाठी राज्य सरकारला दिली आहे. 25 लिटर दूध देणारी गाय तयार करा. गीरची गोरी बचाओ अभियान सुरू झालंय. गाय 20 लीटर दूध देते. सीमन आधी दीडशे रुपयांत मिळत होते, ते 80 रुपयांत मिळते. विदर्भात रोज 50 लाख लीटर दूध व्हावं, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
इथेनॉलची पेट्रोल कॅलरी व्हॅल्यू सारखीच
नितीन गडकरी म्हणाले, जपानच्या कार आता 100 टक्के फ्लेक्स इंजीनवर येणार आहे. टीव्हीएस, बजाज स्कूटर, बाईक फ्लेक्स इंजीनवर येणार आहे. 100 टक्के बायोइथेनॉलवर चालणार आहेत. 1 लीटर इथेनॉल 800 एमएल पेट्रोलच्या बरोबर आहे. कॅलरी व्हॅल्यू. इथेनॉलची पेट्रोल व्हॅल्यू सारखीच राहणार असल्याचं संशोधन झाले आहे. त्यामुळं पेट्रोलऐवजी इथेनॉल वापरा खर्च कमी होईल. प्रदूषण कमी होईल.
तालुकास्तरावर इथेनॉलचे पंप सुरू करा
इथेनॉलवर चालणाऱ्या सुजुकी, टोयाटो हुंडाई गाड्या बाजारात येत आहेत. ऑटोरिक्षा, कार, दुचाक्या इथेनॉलवर चालतील. इथेनॉलचे पंप सुरू करावे लागतील. दोनशे कोटींचे टर्न ओव्हर आहे. पंप मागायचं असेल, तर तालुका स्तरावर एजन्सी देण्यात येणार आहे. उसावर ड्रोननं फवारणी करण्यात येईल. पुढच्या अग्रोव्हीजनमध्ये ड्रोन द्या. याचा बराच फायदा होईल, असं सांगायलाही गडकरी विसरले नाहीत.