गरिबांच्या तांदळाला भ्रष्टाचाराची किड, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत नागपुरात निकृष्ट धान्याचे वाटप
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात येणारे धान्य निकृष्ट असल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलंय. कोरोनात दारिद्रय रेषेखालील लोकांना मोफत धान्य दिलं जातंय. (Inferior rice in Nagpur ration grain supply department)
नागपूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देण्यात येणारे धान्य निकृष्ट असल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलंय. कोरोनात दारिद्रय रेषेखालील लोकांना मोफत धान्य दिलं जातंय. मात्र, नागपुरात जनावरं सुद्धा खाणार नाही असा तांदूळ या गरिबांना दिला जातोय. (Inferior rice in Nagpur ration grain supply department)
रेशन धान्य पुरवठा विभागात येणारा तांदूळ निकृष्ट
गेल्या दोन महिन्यांपासून नागपूरच्या रेशन धान्य पुरवठा विभागात येणारा तांदूळ निकृष्ट आहे. तांदळामध्ये 20 टक्के तांदळाच्या कनक्या (तुटलेला तांदूळ) मिक्स केलेला चालतो. मात्र, या तांदळात 60 टक्क्यांपेक्षा अधिक कनक्या मिसळविल्या जात आहेत.
कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय
शिवाय या तांदळात पांढरे खडे मिसळवल्याचा आरोपंही केला जातोय. त्यामुळं यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप रेशन दुकानदार संघटनेने केलाय. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत निकृष्ट धान्याचे वाटप होतंय. स्वस्त धान्य पुरवठा विभागाच्या गोदामात निकृष्ट धान्याचा पुरवठा होतोय. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
(Inferior rice in Nagpur ration grain supply department)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 7 July 2021 https://t.co/VxS5s4m6LJ #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2021
हे ही वाचा :