Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’वर राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती; नागपुरात रेल्वेने वेधले प्रवाशांचे लक्ष

दोन वर्षात केलेली विविध विकासकामे आणि योजनांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पाच विशेष गाड्यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर –गोंदिया ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’वर आकर्षक पद्धतीने योजनांची माहिती देण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’वर राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती; नागपुरात रेल्वेने वेधले प्रवाशांचे लक्ष
महाराष्ट्र एक्सप्रेसवर अशाप्रकारे जाहिराती करण्यात आल्या आहेत.
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 12:32 PM

नागपूर : राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त (On the occasion of the biennial anniversary of the State Government) विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी निवड करण्यात आलेल्या पाच रेल्वेमध्ये कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसचा (Kolhapur-Gondia Maharashtra Express) समावेश आहे. आकर्षक पद्धतीने जाहिराती लावलेल्या या रेल्वेने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’, ‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या घोषवाक्यांसह योजनांची माहिती देण्यासाठी वापर करण्यात आला आलाय. त्यामध्ये महिला सक्षमीकरणाअंतर्गत कुटुंबातील महिलांच्या नावावर घर असल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्क्याची सूट दिली आहे.

कौशल्य विकास-रोजगार मेळावा (Skill Development-Employment Fair) आणि वेबपोर्टलद्वारे दीड लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. जिथे सारथी तिथे प्रगती – क्षमता आणि कौशल्य वृद्धीसाठी शिक्षण-प्रशिक्षण देणार आहे. यासोबतच गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर अभ्‌यासक्रम आणि डाटा सेंटर सुरू केल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे भविष्य उजळणार आहे. पर्यावरणपूरक प्रवासाला राज्य शासन प्राधान्य देत आहे. विद्युत बस सेवेत वाढ होणार आहे. परिणामी राज्यातील प्रदूषणाला आळा बसणार आहे. राज्य शासनाने मुंबईतील ‘आरे’ जंगलामध्ये वृक्षांसाठी 808 एकर क्षेत्र आरक्षित झाले आहे. वनसंपदेचे रक्षण झाल्याची माहिती राज्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे.

मोफत सातबारा आता दारी येणार

समृद्ध शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी राज्य शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. गतवर्षी चक्रीवादळबाधित फळबागांसाठी पुनर्लागवड व पुनरुज्जीवन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच कोरोना महामारीमध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखांची मुदत ठेव योजना सुरू करण्यात आली असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. चिंतामुक्त शेतकरी, मोफत सातबारा आता दारी येणार, ई-पीक पाहणी नोंदणीही करता येणार या योजनांनाही येथे प्राधान्य देण्यात आले आहे.

चांगल्या सोईसुविधा देण्याचा प्रयत्न

युवकांमध्ये कौशल्य निर्मिती व्हावी, त्यांच्या हाताला काम मिळावे, त्यासाठी जिथे ‘सारथी’ तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्य, वृद्धीसाठी शिक्षण- प्रशिक्षण आदींची माहिती देण्‍यात आली. ‘माझी वसुंधरा’ आणि संयुक्त राष्ट्र हवामानबदल परिषदेत पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. तसेच कोकणातील समुद्रकिनारे, येथील पर्यटन वाढीस राज्य शासन चालना देत आहे. येथे देश- विदेशातून पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच त्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर विमानसेवेचा प्रारंभ झाल्याचाही उल्लेख आहे.

राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती जनतेसाठी

राज्यात शेती, क्रीडा, सामाजिक इत्यादी क्षेत्रात राज्य शासनाचे विविध उपक्रम सुरू आहेत. दोन वर्षांत राज्य सरकारने अनेक विविध विकासकामे केली आहेत. राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी 1 फेब्रुवारी ते 2 मार्चदरम्यान एक महिना उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नागपूर मुख्य रेल्वेस्थानकावरुन ही रेल्वे पुढे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या योजनांचा संदेश पोहचविणार आहे. कोल्हापूर ते नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेवर दिलेल्या विविध योजना, विकासकामांच्या आदी संदेशाचे कौतुक केले.

Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणूक, नवीन प्रभाग रचनेचा परिणाम; कोणत्या प्रभागातून लढायचं यावरून संभ्रम

Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यात आज फेरफार अदालत; कुठे करता येणार शेती-मालमत्तेची फेरफार?

मॅनेजर बायकोच्या चारित्र्यावर संशय, खुनाच्या इराद्याने ऑफिस गाठलं, चाकू हल्ल्यात बॉस गंभीर

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.