500 रुपये विड्रॉल करा 2500 घरी घेऊन जा; एटीएमबाहेर नागरिकांची रांग, पोलीसही म्हटले पैसे वसूल करणार

नागपूरच्या खापरखेडामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएममध्ये 500 रुपये विड्रॉल केले असता चक्क अडीच हजार रुपये मिळत होते. पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एटीएमबाहेर तोबा गर्दी केली.

500 रुपये विड्रॉल करा 2500 घरी घेऊन जा; एटीएमबाहेर नागरिकांची रांग, पोलीसही म्हटले पैसे वसूल करणार
गोरेगावमध्ये एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले पैसे पळवलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 10:53 AM

नागपूर : नागपूरमधून (Nagpur) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएममधून (ATM) पाचशे रुपये विड्रॉल टाकल्यावर चक्क अडीच हजार रुपये निघत होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी पैसे (Money) काढण्यासाठी एटीएमबाहेर गर्दी केली. हा प्रकार नागपूरमधील खापरखेडा गावात घडला आहे. खापरखेडा गावातील शिवा कॅम्पेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाली होती. नागरिकांनी विड्रॉलसाठी पाचशे रुपये टाकले असता त्यांना चक्क अडीच हजार रुपये मिळत होते. विशेष म्हणजे जी रक्कम एटीएममधून विड्रॉल झाली त्याचा कोणताही एमएमएस ग्राहकांच्या मोबाईलवर आला नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. त्यानंतर पोलिसांनी या एटीएमचे शटर बंद केले. तोपर्यंत अनेकांनी या एटीएममधून पाचशे रुपयांच्या मोबदल्यात अडीच हजारांची रक्कम काढली होती.

गर्दी वाढल्याने संशय

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरच्या खापरखेडा गावातील शिवा कॅम्पेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँकेचे एक एटीएम आहे. या एटीएममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने या एटीएममधून पाचशे रुपयांऐवजी अडीच हजार रुपये ग्राहकांना मिळत होते. ही बातमी वेगाने गावात पसरली आणि नागरिकांनी पैसे काढण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएमबाहेर गर्दी केली. एटीएमबाहेर मोठी रांग लागली. या एटीएममधून अनेकांनी अडीच हजार रुपये काढले. ज्यांनी पैसे काढले त्यांना पैसे कट झाल्याचा एसएमएस देखील आला नाही. याच एटीएम शेजारी इतर बँकांचे देखील एटीएम आहेत. मात्र याचा एटीएमबाहेर झालेली गर्दी पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना संबंधित प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित एटीएम ताक्ताळ बंद केले. मात्र तोपर्यंत अनेकांनी पैसे काढले होते.

हे सुद्धा वाचा

पैसे परत वसूल केले जाणार

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की एटीएममध्ये काहीतरी तात्रिक बिघाड झाला असावा. त्यामुळे नागरिकांना पाचशे रुपयांऐवजी अडीच हजार रुपये मिळत होते. दरम्यान ज्या-ज्या लोकांनी या एटीएममधून पैसे काढले, त्यांचा डाटा गोळा करण्याचे काम सुरू असून, त्यांच्याकडून अतिरिक्त सर्व रक्कम वसूल करण्यात येणार आहेत. घटना कळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेत हे एटीएम बंद केले होते. मात्र तोपर्यंत अनेकांनी पैसे काढले असावेत असा अंदाज आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.