Nagpur Administration भीती ओमिक्रॉनची, प्रशासन लागले कामाला, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरू करण्याच्या सूचना

मेयो, मेडिकल येथे प्रत्येकी दोन तर एम्समध्ये चार पीएसए प्लांट सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना तसेच इतर योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी येणार्‍या अडचणी संदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी आर. विमला यांनी प्रत्यक्ष भेट दिली.

Nagpur Administration भीती ओमिक्रॉनची, प्रशासन लागले कामाला, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरू करण्याच्या सूचना
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 9:56 AM

नागपूर : देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झालाय. त्यामुळं प्रशासन खळबळून जाग झालंय. ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ सुरू करा, अशा सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्यात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.

मेयो, मेडिकल येथे प्रत्येकी दोन तर एम्समध्ये चार पीएसए प्लांट सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना तसेच इतर योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी येणार्‍या अडचणी संदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी आर. विमला यांनी प्रत्यक्ष भेट दिली. अपूर्ण कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिलेत.

सोबत वैद्यकीय तज्ज्ञांचा फौजफाटा

मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, डॉ. वैशाली शेलगावकर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे अतिरिक्त संचालक डॉ. कृष्णा तिरमनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर आदी पाहणी दौर्‍यात उपस्थित होते.

कंत्राटदाराला दिली मुदत

मेडिकलमध्ये दोन ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसविण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा दहा डिसेंबरपूर्वी करावा. ऑक्सिजन निर्मिती प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला 16 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाने आवश्यक बांधकाम व विद्युत जोडणी पूर्ण करावी. ऑक्सिजन प्लांटच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कार्यवाही करावी. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या बायोमेडिकल अभियंत्याच्या सेवा घेण्याबाबतही प्रस्ताव तयार करावा, असेही निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

दर आठवड्याला करा ऑक्सिजनचे ऑडीट

एम्समध्ये बसविण्यात आलेल्या चार ऑक्सिजन निर्मिती प्लांटची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. ऑक्सिजन निर्मितीसाठी येणार्‍या अडचणी सोडविण्यासंदर्भात एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्यासोबत चर्चा केली. मेयो, मेडिकल तसेच एम्समध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दर आठवड्याला ऑक्सिजनचे ऑडिट करा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Nagpur education फिरत्या बसमधून संगणक शिक्षण, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना लागणार गोडी

Dinosaur Fossil चंद्रपुरात आढळले डायनासोरचे जीवाश्म, प्रा. सुरेश चोपणे यांचे संशोधन

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.