Engineering | नागपूरमध्ये अभियांत्रिकी प्रवेशात आयटी, कम्प्युटर फुल्ल; मेकॅनिकल, सिव्हिलमध्ये शुकशुकाट का?

नागपूरमध्ये अभियांत्रिकी प्रवेशात आयटी आणि काम्प्युटर फुल्ल झाल्याचे चित्र आहे. तर मेकॅनिकल आणि सिव्हिलमध्ये जागा रिकाम्या आहेत.

Engineering | नागपूरमध्ये अभियांत्रिकी प्रवेशात आयटी, कम्प्युटर फुल्ल; मेकॅनिकल, सिव्हिलमध्ये शुकशुकाट का?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 6:14 AM

नागपूर : प्रवेशाच्या पहिल्या यादीनुसार अभियांत्रिकींच्या प्रवेश प्रक्रियेत आयटी, कॉम्प्युटर (Computer) सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, आर्टिफिशल इंटेलिजन्स यासारख्या विषयात प्रवेश (Admission) जवळपास पूर्ण झाले आहेत. दुसऱ्याही यादीमध्ये याच अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे दिसून येते. याउलट, मेकॅनिकल, सिव्हिल या कोअर शाखांमधील काही जागा खाली आहेत. या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा कल कमी दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयामधील प्रवेशामध्ये रिक्त जागांची संख्या यंदा कमी झाली आहे. नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये असलेल्या एकूण जागांपैकी 81.56 टक्के जागा भरल्या आहेत. त्यामुळं यावर्षी प्रवेशाबाबत आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

अभियांत्रिकी प्रवेशात पाच टक्के वाढ

अभियांत्रिकी या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पुणे, मुंबई ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. त्यामुळे एमएच-सीईटीसह इतर प्रवेश पात्रता परीक्षांचे निकाल लागताच, विद्यार्थी प्रवेशासाठी पुणे, मुंबईच्या दिशेने धाव घेतात. पालकांकडून या ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी डोनेशन देण्याची तयारी असते. याचाच परिणाम म्हणून एकेकाळी विद्यार्थ्यांनी भरलेल्या महाविद्यालयांवर गेल्या सहा ते सात वर्षांपासून रिक्त जागांचे संकट ओढविले होते. परंतु, दोन वर्षांपासून देशात कोरोनाचे संकट आहे. त्यातही गेल्या वर्षी विभागातील 35 टक्के विद्यार्थ्यांनी बाहेरचा पर्याय निवडला होता. त्यामुळं यंदाही अशीच परिस्थिती असेल अशी संस्थाचालकांसह शिक्षक आणि प्राचार्यांना वाटत होते. पण, वेगळेच घडले. यावर्षी एप्रिल ते जूनदरम्यान आलेल्या दुसऱ्या लाटेचा अनेक विद्यार्थी-पालकांनी धसका घेतला. या कोरोनाच्या लाटेत संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा होता. अशा परिस्थितीत या ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या मनःस्थितीत पालक दिसत नाहीत. त्यामुळं गेल्या वर्षी अभियांत्रिकीच्या प्रवेशात पाच टक्क्यांची वाढ दिसून आली.

सीईटी सेलतर्फे प्रवेश

यंदा राज्याच्या सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यात आले. त्याची अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर 29 नोव्हेंबरपासून प्रवेश फेरीस सुरुवात करण्यात आली. त्यानुसार यंदा नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 81.56 टक्के प्रवेश झाले आहेत. यामध्येही नामवंत महाविद्यालयातील प्रवेश जवळपास पूर्ण झाले. यामध्येही सर्वाधिक 85 टक्के प्रवेश नागपूर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये झाले.

Chandrasekhar Bavankule | गारपिटीचे नुकसान मोठे; चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, सरकारकडं शेतकऱ्यांसाठी वेळ नाही का?

Tarri Pohe | नागपुरातील तर्री पोह्याची चव हरपली; रूपम साखरे यांचे निधन

Nagpur Corona | लग्नसमारंभात पन्नास जणांनाच परवानगी; पण, लक्षात कोण घेतोय?, नागपूर मनपा प्रशासन उगारतोय बडगा

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....