त्या खोडसाळ ट्विटमागे नेमकं कोण..? ती माहितीही आली समोर, मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टच सांगितलं…

बसवराज बोम्मई यांनी हे ट्विट केलं नसेल, त्यांचे अकाऊंट हॅक झाले असेल तर त्याची चौकशी करून ते नेमकं कोणी ट्विट केले हे एलन मस्क यांनीच स्पष्ट करावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

त्या खोडसाळ ट्विटमागे नेमकं कोण..? ती माहितीही आली समोर, मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टच सांगितलं...
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 9:33 PM

नागपूरः सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर सीमावादाची नव्याने ठिणगी पडली. त्यामुळे हा वाद प्रचंड चिघळला. त्यातच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादाविषयी ट्विट केल्यामुळे हा वाद चिघळून दोन्ही राज्यात वाहनांच्या तोडफोडीच्याही घटना घडल्या. त्यानंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमिथ शाह यांची भेट घेऊन हा सीमावादावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी बोम्मई यांच्या या ट्विटची चर्चा करून हे ट्विट नेमकं कोणी केलं याचीही विचारणा करण्यात आली.

त्यानंतर बोम्मई यांनी आपलं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी हा वाद ट्विटरचे मालक एलन मास्क यांच्या दारात घेऊन गेले आहेत.

बसवराज बोम्मई यांनी हे ट्विट केलं नसेल, त्यांचे अकाऊंट हॅक झाले असेल तर त्याची चौकशी करून ते नेमकं कोणी ट्विट केले हे एलन मस्क यांनीच स्पष्ट करावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त ट्विट आपण केले नसल्याचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच सांगितले होते. मात्र तरीही त्यांच्या या ट्विटमुळे दोन्ही राज्यात वाद निर्माण झाल्यामुळे या ट्विटची चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली.

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले की, अमित शाह यांच्यासमोरच आम्ही त्यांच्या या ट्विटबद्दल विचारणा केली होती. त्यांनी स्पष्टीकरण दिले होते असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यावरून आम्ही राजकारण करणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले आहे.

बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून सीमावाद चिघळवाल्यातील प्रकार झाल्याने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी बोम्मई यांच्यावर टीका करत त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी एलन मस्कला सांगावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.