अनिल देशमुखांवरील हा हल्ला म्हणजे स्टंटबाजी; भाजपकडून संशय व्यक्त
Ncp sharad pawar group Leader Anil deshmukh injured : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर नागपूरमधील काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनिल देशमुख गंभीररित्या जखमी झालेले आहेत. वाचा सविस्तर बातमी...
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमध्ये गाडीवर दगडफेक झाली आहे. अनिल देशमुख यांच्यावर काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीची काच फुटली आहे. तसंच अनिल देशमुखांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाले आहे. त्यांच्यावर काटोलमधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनिल देशमुखांवरील हा हल्ला म्हणजे स्टंटबाजी असल्याचं म्हणत भाजपकडून या हल्ल्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी संशयास्पद असल्याचं भाजपकडून म्हणण्यात आलं आहे.
भाजपकडून संशय व्यक्त
भाजपचे नेते परिणय फुके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सहानुभुती मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांच्याकडून दगड फेकीचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाली. देशमुखांच्या गाडीच्या काचांना क्रॅक गेलेले दिसत आहेत. दगड जर लांबून फेकलेला असता तर काचेवर पडला असता मग तो बोनेटवर पडला असता. पण गाडीच्या बोनेटवर एकही स्क्रॅश दिसत नाहीये. गाडीची मागच्या बाजूची काच फुटलेली आहे. देशमुख ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आहेत. त्यांच्या पायाजवळ एक दगड पडलेला दिसत आहे. या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहे, असं परिणय फुके म्हणाले आहेत.
नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार देण्यात आली आहे. सलील देशमुख यांची शेवटची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख आपल्या घरी काटोलला परतत असताना अज्ञात व्यक्तीने देशमुखांच्या गाडीवर दगड फेकला. यात अनिल देशमुख यांनी जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून गाडीची तपासणी
अनिल देशमुख यांच्या ज्या गाडीवर दगडफेक झाली ती गाडी tv9 वर… पारडसिंगा जवळील बेल फाटा परिसरात अंधाराचा फायदा घेत दगडफेक करण्यात आली. गाडीची समोरची काच अनिल देशमुख बसले होते. त्या भागाकडून पूर्णतः ब्रेक झाला आहे. मोठा दगड काचेवर पडला त्यामुळे काच फुटली आहे. पोलिसांकडून गाडीची तपासणी केली जात आहे. पोलीस सगळ्या बाजूने तपासणी करत आहेत.