दारुवाले, मटकावाले, गुटखावाले, पैशावाले शिंदेंच्या मंत्रिमंडळात; ओबीसी नेत्याचे गंभीर आरोप

Laxman Hake on Shinde Government : ओबीसी नेते लक्ष्म्ण हाके यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. दारुवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसावाले शिंदेंच्या मंत्रिमंडळात आहे, असं ते म्हणालेत. शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत या नेत्यांना घरी बसवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वाचा...

दारुवाले, मटकावाले, गुटखावाले, पैशावाले शिंदेंच्या मंत्रिमंडळात; ओबीसी नेत्याचे गंभीर आरोप
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 12:01 PM

सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी यासाठी उपोषणही केलं होतं. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलं आहे. दारुवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसावाले… आहेत. ज्यांना रिजर्वेशनचं स्पेलिंग माहित नाही. असे डझनभर मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहे. त्यांना आम्ही पाडणार आहोत, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

लायक माणसं विधानसभेत पाठवणार- हाके

आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी बांधवांना ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्यांकांच्या मतदान करतील. ओबीसी असंघटित आहे. याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही, असं कोणी समजू नये. नालायक लोक विधानसभेत असलीत तर आम्ही विधानसभेत लायक माणसं पाठवू. संविधानीक तत्त्वावर बोलणारी माणसं पाठवू, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

उद्या मुंबईला जाणार आहोत. आम्ही काही लोकांची यादी बनवली आहे. त्या मतदारसंघात काम करणार आहोत. काही IT कंपन्यांसोबत बोललो आहे. 100 मतदार संघातील लोकांची मत जाणून घेतली. आम्ही प्रॅक्टिक्स करतो फक्त बोलत नाही. जातीनिहाय 100 लोकांची यादी आहेत. त्यात सर्वपक्षीय लोक, ज्यांनी जरांगेला रसद पुरविली, पाठिंबा दिला, त्यांना ओबीसी समाज पाडणार आहे, असा इशाराही हाके यांनी दिला आहे.

राजेश टोपेंवर टीकास्त्र

रोहित पवार ज्या कर्जत जामखेडमधून निवडून आले. राजेश टोपे ज्या घनसावंगीतून निवडून येतात. तिथे ओबीसींची संख्या किती? ओबीसीने यांनी मतदान केलं नाही का? यांना फक्त जरांगे दिसतात का? राजेश टोपे म्हणतात मी सेक्युलर आहेस पण राजेश तू खरंच सेक्युलर आहे का? कारण शोषित वंचितावर हे लोक एक शब्द बोलत नाही, अशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्यावर टीका केलीय.

नेते लोकप्रितनिधी होण्यात, आमदार खासदार होण्यात आम्ही जनतेचा हिस्सा नाही का? चंद्रशेखर बावनकुळे स्वत: ला ओबीसी नेता म्हणून घेतात. पण ओबीसी आरक्षण जात असताना ते बोलत नाहीत. त्यांना आता लोक दारात उभे का करणार?, असं म्हणत हाके यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

सरकारकडून बहिणीच्या खात्यात अॅडवान्स पैसे, सामंत महिलांना देणार मोबाईल
सरकारकडून बहिणीच्या खात्यात अॅडवान्स पैसे, सामंत महिलांना देणार मोबाईल.
शाह विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा ठरवणार, मविआचंही ठरलं?
शाह विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा ठरवणार, मविआचंही ठरलं?.
भुयारांच्या वक्तव्यानं संताप; शेतकऱ्याचं लग्न 3 नंबरच्या तर 1 नंबरची..
भुयारांच्या वक्तव्यानं संताप; शेतकऱ्याचं लग्न 3 नंबरच्या तर 1 नंबरची...
शिवनेरीतली सुंदरी हसली पण लालपरी रुसली? एसटी कर्मचारी काय म्हणताय?
शिवनेरीतली सुंदरी हसली पण लालपरी रुसली? एसटी कर्मचारी काय म्हणताय?.
छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?
छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?.
शिवनेरी सुंदरीवरून रोहित पवार भडकले; एसटीच्या नव्या अध्यक्षांवर निशाणा
शिवनेरी सुंदरीवरून रोहित पवार भडकले; एसटीच्या नव्या अध्यक्षांवर निशाणा.
हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल, 'खलनायकाला लाजवेल असं...'
हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल, 'खलनायकाला लाजवेल असं...'.
नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘वर्षा’वर खलबतं, काय झाली चर्चा
नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘वर्षा’वर खलबतं, काय झाली चर्चा.
रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल, असं विशाल पाटीलचं काम...,कोणाची टीका?
रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल, असं विशाल पाटीलचं काम...,कोणाची टीका?.
'कहो दिल से धनुभाऊ फिरसे', समर्थकांचा स्वॅगच न्यारा, प्रचारास सुरूवात
'कहो दिल से धनुभाऊ फिरसे', समर्थकांचा स्वॅगच न्यारा, प्रचारास सुरूवात.