NMC election | नागपूर मनपा निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी, दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण

गेली पंधरा वर्षे नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी आता राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी सुरू आहे. पण, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही, तर राष्ट्रवादी स्वबळावर मनपा निवडणुका लढण्यास सज्ज असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

NMC election | नागपूर मनपा निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी, दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्टीकरण
गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दिलीप वळसे पाटील
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 9:29 AM

नागपूर : मनपा निवडणुकीत (Municipal Corporation) सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच काँग्रेससोबत आघाडी करू, असं मत गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी व्यक्त केलंय. नागपूर मनपातील सर्व वॅार्डात निवडणूक तयारी करण्याच्या सूचना पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. पदाधिकाऱ्यांवर प्रभागांची जबाबदारी सोपविली. नागपूर मनपात काँग्रेसने आधीच स्वबळाचा नारा दिला होता. आता राष्ट्रवादीची स्वबळाच्या दिशेनं तयारी करत आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, राष्ट्रवादीकडे अनेक संस्था आहेत. त्या माध्यमातून लोकांची कामे करण्यावर भर दिला पाहिजे. नागरिकांची मदत करावी. राष्ट्रवादीतील छपास नेत्यांचीही कानउघाडणी केली. कामावर लक्ष द्यावे, असं कार्यकर्त्यांना उद्देशून ते बोलत होते. राष्ट्रवादीनं आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली. गेली पंधरा वर्षे नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी आता राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी सुरू आहे. पण, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही, तर राष्ट्रवादी स्वबळावर मनपा निवडणुका (Election) लढण्यास सज्ज असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

225 जणांचे निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे अर्ज

दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. मनपा निवडणुकीच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. महापालिका निवडणुकीसाठी 225 जणांनी पक्षाकडे अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांनी अर्ज करावे. राज्यस्तरीय नेत्यांनी या निवडणुकीत भाग्य आजमावावे. प्रत्येकाला एकएका प्रभागाची जबाबदारी दिली जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले. काही पदाधिकार्‍यांनी दोन ते तीन प्रभागांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखविली. अधिकाअधिक जागा जिंकण्यासाठी एका एका प्रभागावर लक्ष केंद्रित करावे, असे वळसे पाटील यांनी सांगितलं.

पक्षसंघटनेला बळकट करा

पक्षसंघटनेला अधिक बळकट करण्यासाठी पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावे, असेही निर्देश वळसे पाटील यांनी रविभवन येथे पार पडलेल्या बैठकीत दिले. बैठकीला शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे, माजीमंत्री रमेश बंग, राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, सुबोध मोहिते, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, ईश्‍वर बाळबुधे, शेखर सावरबांधे, वेदप्रकाश आर्य, प्रशांत पवार, श्रीकांत शिवणकर, वर्षा शामकुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur Water | पाण्याचा कमी दाबाने पुरवठा, पाणी चोरांवर मनपाची कारवाई, नागपुरात टिल्लू पंप जप्त

Narayan Rane | तीन पक्षांचं सरकार जूनमध्ये कोसळणार; वाशिममध्ये नारायण राणे यांनी वर्तविले भाकीत

Amravati | अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेंना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकरांची मागणी

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.