“मला डिस्टर्ब करू नका, तुमचं मंत्रिपद दूर जाईल”: अजितदांनी भर सभागृहात ‘या’ नेत्याला दम भरला…

भरत गोगावले तुम्ही मला जेवढी अडचण निर्माण कराल तेवं मंत्रिपद दूर जाईल असा टोला त्यांना लगावल्यानंतर मात्र सभागृहामध्ये हस्यकल्लोळ माजला.

मला डिस्टर्ब करू नका, तुमचं मंत्रिपद दूर जाईल: अजितदांनी भर सभागृहात 'या' नेत्याला दम भरला...
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 7:46 PM

नागपूरः राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, त्यामुळे सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना निर्णयाच्यादृष्टीने महत्वाचा असतो. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आजच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भाषणं केली त्यामध्ये राज्याच्या विकासापेक्षा, धोरणांच्या मुद्यापेक्षा त्यामध्ये त्यांचे राजकीयच भाषण अधिक होते असा टोलाही अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

विधिमंडळामध्ये भाषण करताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टोलेबाजी केली. मात्र त्याचवेली त्यांनी मुख्यमंत्री पदावर असतानाची त्यांची जबाबदारी काय लोकांच्या अपेक्षा काय यावरही त्यांनी चर्चा केली. विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत असताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले त्यांना बोलताना व्यत्यय आणत होते.

त्यावेळी त्यांनी भरत गोगावले यांना सांगितले की, तुम्ही मला डिस्टर्ब करू नका नाही तर तुम्हाला माहिती नाही का माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध किती जवळचे आहेत. ते मला जेवढी अडचण निर्माण कराल, तेवढं मंत्रिपद दूर जाईल असा दमही त्यांनी गोगावले यांना भरला. त्यानंतर सभागृहात मात्र हशा पिकाला.

भरत गोगावले तुम्ही मला जेवढी अडचण निर्माण कराल तेवं मंत्रिपद दूर जाईल असा टोला त्यांना लगावल्यानंतर मात्र सभागृहामध्ये हस्यकल्लोळ माजला. यावेळी अजित पवार यांनी राज्याच्या विकासाबरोबरच मुख्यमंत्र्यांनी आता राज्याच्या धोरणावर लक्ष ठेऊन ते पक्क केले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांना तुम्ही राजकीयदृष्ट्या लक्ष्य करत होता. हे मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभणारं नाही.

त्यांच्यावर काय टीका करता. तुमचे प्रवक्ते असतील तर त्यांना तुमची बाजू मांडायला सांगा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.

यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अजित पवार यांना बोलताना व्यत्यय आणत होते. त्यावेळी त्यांना सज्जड दम भरत भरत गोगावले तुम्हाला माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध माहिती नाहीत. तुम्ही मला अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर तुमचे मंत्रिपद आणखी दूर जाईल असा टोलाही त्यांनी लगावला.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....