अजितदादांची पवार स्टाईलने देवेंद्र फडणवीस यांच्यावर बॅटिंग; बावनकुळेंचा करेक्ट कार्यक्रम होणार…

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत दिशा सालियन प्रकरण, खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील तरुणीचा बलात्काराचा आरोप आणि गौण खनिजावरुन खडसेंच्या पत्नीची चौकशी करण्यासाठी SITची घोषणा झाली.

अजितदादांची पवार स्टाईलने देवेंद्र फडणवीस यांच्यावर बॅटिंग; बावनकुळेंचा करेक्ट कार्यक्रम होणार...
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 10:59 PM

नागपूरः नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मनसोक्त बोलण्याची संधी मिळाली आणि अजित पवार यांनी आपल्या स्टाईलनं या संधीचं सोनंही केलं. दादांनी फडणवीसांनी चिमटेही काढले आणि जोरदार टोलेबाजीही केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत, तुफान बॅटिंग केली आहे. चंद्रकांत पाटील या कोल्हापूरच्या ढाण्या वाघाकडे, फक्त एक दोन खाती आणि फडणवीस यांच्याकडे 6-6 खाती आहेत. त्यामुळं या गोष्टीचा तुम्हाला तळतळाट लागेल, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

विधानसभेत अजित पवार यांच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री फडणवीसच होते मग महाविकास आघाडीच्या काळातील कामांना दिलेली स्थगिती असो की, अद्याप नसलेल्या महिला मंत्री हा विषय असो या आणि अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी फडणवीस यांना जोरदार टोलेबाजी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना टोले आणि चिमटे लगावले असले तरी, अजित पवार यांनी ताकदवान नेते म्हणत फडणवीसांचं कौतुकही केलं आहे. भाजपमध्ये सर्वात ताकदवान नेते देवेंद्र फडणवीस असल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांचा गौरवही केला आहे.

तसं तर विधानसभेचं काम सुरु होताच, अजित पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली होती. प्रश्नोत्तराच्या काळात मुख्यमंत्री शिंदे हजर नसल्यानं अजितदादांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळ मुख्यमंत्री प्रश्नोत्तारावेळी हजर का नाही ? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर विधानसभेतून अजितदादांच्या निशाण्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही आले.

काही महिन्यांआधी बावनकुळे यांनी बारामतीतलं राष्ट्रवादीतलं घड्याळ बंद करण्याचा इशारा दिला होता पण मनात आणलं तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशाराही अजितदादांनी यावेळी बावनकुळे यांना दिला आहे.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत दिशा सालियन प्रकरण, खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील तरुणीचा बलात्काराचा आरोप आणि गौण खनिजावरुन खडसेंच्या पत्नीची चौकशी करण्यासाठी SITची घोषणा झाली.

त्यावरुनही दादांनी आपल्या स्टाईलमध्ये सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. काही झालं की एसआयटी असं धोरणच भाजपने अवलंबिले आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

अजितदादा यांनी आपल्या स्टाईलमध्ये फडणवीस आणि बानकुळेंना टोले लगावले असले तरी आता उत्तर देण्याची वेळ मात्र फडणवीसांची असणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.