Nagpur -मतदार पळवापळवीची भीती, विधान परिषद निवडणूक, नगरसेवकांवर ठेवणार पाळत
नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे जास्त नगरसेवक असले, तरीही काँग्रेस आणि भाजपकडूनंही खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आप आपल्या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी नेण्याच्या तयारीत आहेत.
नागपूर : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपलाही मतदार पळवापळवीची भीती आहे. त्यामुळंच प्रत्येक पक्ष आपल्या मतदारांना सुरक्षित स्थळी नेण्याची तयारी करत आहेत. मतांच्या गणितात भाजपचं पारडं जड आहे. त्यामुळं काँग्रेस लवकरच आपल्या नगरसेवकांना पिकनिकसाठी नेणार आहेत, तर खबरदारी म्हणून भाजपही आपले उमेदवार सुरक्षित स्थळी नेणार असल्याची माहिती आहे.
नागपूर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झालेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे तर काँग्रेसकडून छोटू भोयर मैदानात आहेत. या निवडणुकीत 556 मतदार आहेत. यात सध्या तरी 60 मतांनी भाजपचं पारडं जड आहे. अशा स्थितीत काँग्रेस आणि भाजपकडूनंही दक्षता घेतली जातेय. निवडणूक लढवण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करू, आम्ही 400 पेक्षा जास्त मतांनी ही निवडणूक जिंकू, असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी व्यक्त केलाय.
भाजपकडे 60 मतं जास्त
नागपूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीत एकूण 556 मतदार आहेत. यापैकी भाजपकडे 60 मतं जास्त आहेत. असा स्थितीत खबरदारी म्हणून काँग्रेसंही आपल्या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी नेणार आहेत. आमचे नगरसेवक फुटणार नाही. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. पण या निमित्ताने नगरसेवकांना अभ्यास दौरा करायचा असेल, तर त्यांना घेऊन जाऊ, असं शहर काँग्रेस अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी सांगितलं. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे जास्त नगरसेवक असले, तरीही काँग्रेस आणि भाजपकडूनंही खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आप आपल्या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी नेण्याच्या तयारीत आहेत.
556 मतदारांपैकी कुठल्या पक्षाकडे किती मतदार? पक्ष मतदार
भाजप – 314 काँग्रेस – 144 राष्ट्रवादी – 15 शिवसेना – 25 बसप – 11 विदर्भ माझा – 17 शेकाप – 06 पिरीपी – 06 भरिएम – 03 एमआयएम – 01 अपक्ष – 10 रासप – 03 प्रहार – 01 रिक्त – 02