Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?
नागपूर जिल्ह्यातील शेतात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू झालाय. रामटेक परिसरातील पंचाळा शिवारात ही घटना घडलीय. शेतीत विद्युत प्रवाह सोडणाऱ्या नंदू शिवरकर याला अटक करण्यात आलीय.
नागपूर : वन्यप्राण्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं. विदर्भातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात (Rabbi season to farmers) याचा सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी नंदू शिवरकर यांनी वित तारा सोडल्या, या तारांना स्पर्श झाल्याने दोन वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झालाय. यात नंदू शिवरकर या शेतकऱ्याला अटक करण्यात आलीय. रामटेक-पंचाळा रोडवरील पंचाळा शिवारात (In Panchala Shivara) बंद असलेल्या चित्रकूट वॉटर पार्कजवळील टॉवरजवळच्या शेतात ही घडना घडली. वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला बिबट्याला स्पर्श झाला. यात एका बिबट्याचा जागीच मृत्यू (A leopard died on the spot) झाला. बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन दिवसांपूर्वी झाला असावा. मात्र, याबाबत वनविभागाला शुक्रवारी माहिती मिळाली. रामटेकचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. शनिवार याबाबत पंचनामा करून बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. नंतर घटनास्थळी अग्नी देण्यात आला.
पंचाळ्यातील शेतमालकाला अटक
या घटनेत शेतमालक नंदू शिवरकर (रा. पंचाळा) याला अटक करण्यात आली. त्यांचे शेत सर्व्हे क्रमांक 43, पंचाळा येथे ही घटना घडली. शेतातील पिकांची वन्यप्राण्यांकडून होणारी नासधूस टाळण्यासाठी करंट लावल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी वापरलेला तार, खुंट्या वनविभागाने जप्त केल्या आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत नंदू शिवरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
बिबट्याचा होता वावर
या घटनेमुळे पंचाळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्रपाल रितेश भोंगाडे, वनक्षेत्र सहायक भगवान गोमासे, वनरक्षक स्वरूप केरवार, कालू बेलकर तपास करीत आहेत. शवविच्छेदनाप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी प्रीती शिरसाठ, अश्विनी गडमडे, सय्यद बिलाल अली व वनकर्मचारी हजर होते. मानव आणि प्राणी असा हा संघर्ष आहे. वन्यप्राणी शिवारात येऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतात. वनविभागाने वन्यरप्राण्यांची व्यवस्था जंगलातच करावी. ते शेतशिवारात येऊ नये, यासाठी जाळीचे कुंपन करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
कोण होता ‘तो’ व्यक्ती, जो एक गाणं ऐकण्यासाठी रोज लता मंगेशकरांना फोन करायचा! वाचा किस्सा