Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येकाच्या हातात श्रीखंडाचा डब्बा… घोषणा एकच… भूखंडाचे… विरोधकांनी विधानसभा परिसर दणाणून सोडला

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली

प्रत्येकाच्या हातात श्रीखंडाचा डब्बा... घोषणा एकच... भूखंडाचे... विरोधकांनी विधानसभा परिसर दणाणून सोडला
प्रत्येकाच्या हातात श्रीखंडाचा डब्बा... घोषणा एकच... भूखंडाचे... विरोधकांनी विधानसभा परिसर दणाणून सोडलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 11:33 AM

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधक आज आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायरीवर येऊन जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारला धारेवर धरलं. खासकरून भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच घेरलं. विरोधकांनी हातात श्रीखंडाचे डब्बे घेऊन भूखंडाचे श्रीखंड खाल्ले कुणी? मुख्यमंत्र्यांनी… मुख्यमंत्र्यांनी… अशा घोषणाच दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे दोन्ही युवा नेते घोषणा देण्यात आघाडीवर होते. दोघांनीही हातात बॅनर घेतला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काल विरोधकांनी भूखंडावरून आरोप केला होता. त्याचे आजही पडसाद उमटले. विरोधकांनी विधानसभेच्या पायरीवर उभं राहून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. यावेळी राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा, असं लिहिलेला बॅनर्स विरोधकांच्या हातात होता.

हे सुद्धा वाचा

घेतले खोके, भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो… बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…

महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो… भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी…गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी आदित्य ठाकरे, रोहित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अजय चौधरी, सचिन अहिर आदी नेतेही घोषणा देत होते. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार तर सर्वात पुढे होते. त्यांच्या हातात बॅनरही होता.

ही घोषणाबाजी सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या आमदारांनी हातात श्रीखंडाचा डब्बा घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी… मुख्यमंत्र्यांनी… मुख्यमंत्र्यांनी… अशा घोषणाच विरोधकांनी दिल्या. विरोधकांच्या या घोषणाबाजीमुळे विधानभवन परिसर दणाणून गेला होता.

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.