Ravi Rana | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विघ्न, रवी राणा यांची टीका, नवनीत राणा म्हणतात, शनी दूर झाली पाहिजे
राज्याची जनता मुख्यमंत्र्यांकडून त्रस्त आहे. यासाठी आम्ही शनी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहोत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं विघ्न आहे. हे दूर झालं पाहिजे. महाराष्ट्रात शांती, सुव्यवस्था नांदली पाहिजे, अशी प्रार्थना देवाला आम्ही करणार आहोत, अशी माहिती रवी राणा यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.
नागपूर : खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पावणे एक वाजता दाखल झाले. पोलिसांनी विमानतळावर राणा दाम्पत्यांशी चर्चा केली. त्यानंतर नवनीत राणा, रवी राणा यांचं नागपूर येथे स्वागत करण्यात आले. रवी राणा यांना हनुमानाची गदा (Hanuman’s Gada) भेट देण्यात आली. रवी राणा म्हणाले, हनुमान चालिसा वाचणं ही आमच्या हिंदूंची संस्कृती आहे. इतका पोलीस बंदोबस्त. इतका दबाव. मला वाटतं, महाराष्ट्रामध्ये हनुमानाचं नाव घेईल त्याला जेलमध्ये टाकण्याचा एकसुत्री कार्यक्रम सुरू आहे. येणाऱ्या काळात रामभक्त, हनुमान भक्त (Ram Bhakt, Hanuman Bhakt) राज्य सरकारला धडा शिकवेल. कारण या महाराष्ट्राच्या पूर्ण संस्कृतीला बुडविण्याचं काम राज्य सरकारनं केलंय. रामनगरमधील या हनुमान मंदिरात आम्ही अजून प्रार्थना करणार आहोत.
मुख्यमंत्र्यांचा अडीच वर्षात विदर्भात पाय नाही
रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरेंचं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे. याठिकाणी शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारी वाढली आहे. भारनियमन आहे. मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भात मुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात पाय ठेवला नाही. मंत्रालयात पाय ठेवला नाही. अशा परिस्थितीत राज्याची जनता मुख्यमंत्र्यांकडून त्रस्त आहे. यासाठी आम्ही शनी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहोत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं विघ्न आहे. हे दूर झालं पाहिजे. महाराष्ट्रात शांती, सुव्यवस्था नांदली पाहिजे, अशी प्रार्थना देवाला आम्ही करणार आहोत, अशी माहिती रवी राणा यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.
महाराष्ट्राची शनी दूर झाली पाहिजे
नवनीत राणा म्हणाल्या, दिल्लीत आम्ही रॅली काढली. पूजन केलं. तिथं सुरक्षा खूप होती. मंदिरात आम्ही हनुमान चालिसा वाचलं. तिथं आरती केली. तिथं काहीही त्रास झाला नाही. पण, महाराष्ट्रात हनुमान चालिसाचा विरोध का, रामाचा विरोध का, असा सवाल नवनीत राणा यांनी केला. आमचे राम भक्त, हनुमान भक्त ठिकठिकाणी पोहचले. आता आम्ही नागपुरातील रामनगर येथील हनुमान मंदिरात महाराष्ट्राची शनी दूर झाली पाहिजे, यासाठी हनुमान चालिसा पठण करत आहोत.