देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याभोवती 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याचे तातडीचे आदेश; कारण काय?

तीन वर्षानंतर पहिल्यांदाच यंदा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे. कोरोनाचं संकट आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे हे अधिवेशन होऊ शकलं नव्हतं.

देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याभोवती 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याचे तातडीचे आदेश; कारण काय?
देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याभोवती 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याचे तातडीचे आदेश; कारण काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 11:16 AM

नागपूर: येत्या 19 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने नागपूरमध्ये अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहेत. मंत्र्यांचे बंगले सज्ज ठेवले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी देवगिरी बंगल्याला 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला या सूचना देण्यात आल्या असून कामालाही सुरुवात झाली आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हं आहेत. शिवाय अधिवेशनावर असंख्य मोर्चे येणार असल्याने या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

पोलीसांच्या सूचनेनुसार नागपूरातील देवगिरी बंगल्याला 10 फूट उंच आणि एक फूट रुंद सुरक्षा भिंत बांधण्याच्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षा भिंतीवर काटेरी तार लावण्याच्या पोलिसांच्या सूचना आहेत. पहिल्यांदाच देवगिरी बंगल्याला इतकी मोठी सुरक्षा भिंत बांधण्यास सुरुवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा

हिवाळी अधिवेशनापूर्वी सुरक्षा भिंत बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते संजय उपाध्ये यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नागपुरातील रविभवन परिसरात उपमुख्यमंत्र्यांचा देवगिरी बंगला आहे.

तीन वर्षानंतर पहिल्यांदाच यंदा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे. कोरोनाचं संकट आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे हे अधिवेशन होऊ शकलं नव्हतं. मात्र, आता हे अधिवेशन नागपूरला होत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तीन वर्षानंतर पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याने या अधिवेशनात असंख्य मोर्चे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान भवन परिसर आंदोलनाने गजबजलेला असणार असल्याने राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून फडणवीस यांच्या बंगल्याला सुरक्षा भिंत बांधली जात असल्याचं बोललं जातंय.

या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवरच अधिक चर्चा होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच विदर्भातील कायदा सुव्यवस्थेवरही चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.