नागपूर : संपूर्ण राज्यात 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आज त्याची मतमोजणी होत आहे. हळूहळू निकाल हाती येत आहेत. नागपुरातील कोराडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गटाने विजय प्राप्त केला आहे. या गटाने एकूण 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवत येथील कोरोडी ग्रामपंचतवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. (koradi gram panchayat is on by bjp and chandrashekhar bawankule pannel)
राज्यात एकूण 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरु आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतमोजणी होत असली तरी नागपुरात भाजपचा चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रस्थ असेलेल्या गावांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या पर्श्वभूमीवर सलग तीन वेळा सत्तेची चव चाखणारा भाजप यंदा कोराडीत आपला गड राखू शकणार का ?, याचीच चर्चा सर्वत्र रंगली होती.
महाविकास आघाडीकडे 7 ग्रामपंचायती
मात्र, यावेळीदेखील कोरडी येथे भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीने चौथ्यांदा सत्ता काबीज केली असून येथे 17 पैकी भाजपचे तब्बल 15 उमेदवार निवडून आले आहेत. येथे चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी गड राखत भाजपचं अस्तित्व टिकवून ठेवल्याचं म्हटलं जात आहे. तर महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलला फक्त 2 जागांवर विजय मिळवता आला आहे. नागपुरात इतर ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु असून आतापर्यंत महाविकास आघीडीने 7 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.
दरम्यान राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरु आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत या वेळी सरासरी 80 टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.
संबंधित बातम्या :
निवडणुकीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह LIVETV
(koradi gram panchayat is on by bjp and chandrashekhar bawankule pannel)