तिकीट कापायचा पॅटर्न ठरला; फडणवीस गडकरींच्या बैठकीनंतर भाजप नगरसेवकांची झोप उडाली!

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडलीय. या बैठकीत चांगली कामगिरी नसलेल्या नागपुरातील भाजप नगरसेवकांना नारळ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तिकीट कापायचा पॅटर्न ठरला; फडणवीस गडकरींच्या बैठकीनंतर भाजप नगरसेवकांची झोप उडाली!
नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 7:39 AM

नागपूर : राज्यातील महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडलीय. या बैठकीत चांगली कामगिरी नसलेल्या नागपुरातील भाजप नगरसेवकांना नारळ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नगरसेवकांची झोप उडाली

साडेचार वर्षात सत्ताधारी भाजपचे काही नगरसेवक प्रभागात फिरकलेच नाहीत. भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी देऊन ४० ते ५० नगरसेवकांना नारळ देण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे. त्यामुळे गडकरी-फडणवीसांच्या बैठकीतनंतर भाजपच्या नगरसेवकांची झोप उडाली आहे.

निवडणुकीत भाजप 25 ते 30 टक्के उमेदवार बदलणार आहे. त्यामुळे नागपूरमधील भाजप नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे. तिकीट कट होणाऱ्या उमेदवारांमध्ये आपला नंबर लागू नये, अशी इच्छा सगळेच भाजप नगरसेवक मनोमन व्यक्त करत आहेत.  गेल्या निवडणुकीत भाजपचे 151 पैकी 108 नगरसेवक निवडून आले होते.

गडकरी-फडणवीस यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक

नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या भेटीवेळी भाजपचे कोअर कमिटीचे काही महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. या बैठकीत नागपूर महापालिका या विषय अजेंड्यावर होता.नागपुरात पंचायत समिती-जि.प. निकालात काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. या सगळ्या पार्श्वभूीवर या बैठकीत विचारमंथन झालं आणि रणनितीही आखण्यात आल्याची माहिती आहे.

समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना नारळ

समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना भाजप वगळणार आहे. तीनच्या प्रभाग पद्धतीचं स्वागत करताना, नागपूर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर महानगरपालिकेतील भाजपचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी तीनच्या प्रभाग पद्धतीचं स्वागत केलंय तसंच त्यांनी पक्षाच्या निर्णयाची माहिती दिलीय.

भाजपचं मिशन नागपूर महानगरपालिका

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूरचे तत्कालीन महापौर आणि उमेदवार संदीप जोशी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवानंतर भाजप सतर्क झाल्याचं दिसून येत आहे. नागपूर महापालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं तरुणांचे मेळावे आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनं एक प्रकारे मिशन नागपूर महापालिका सुरु केलेय.

50 हजार तरुणांची फळी तयार करणार

भाजपच्या वतीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तरुणांचे मेळावे सुरु करण्यात आले आहेत. भाजप नागपूर जिल्ह्यात 50 हजार तरुणांची युवा वॅारियर्सची फळी तयार करणार आहे. एका बुथवर 25 तरुणांची फळी काम करेल. त्यादृष्टीनं भाजपची तयारी सुरु असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

नागपूर महापालिका पक्षीय बलाबल

एकूण सदस्य: 151

भाजप :108

काँग्रेस: 29

बसपा : 10

इतर :04

2011 च्या लोकसंख्येनुसार नवीन वॉर्ड रचना

नागपूर महापालिकेची सध्याची सदस्य संख्या 151 आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार वार्ड रचना होणार असल्यानं नागपूर महानगरपालिकेत 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक लढवण्यास इच्छूक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

हे ही वाचा :

महापालिका निवडणुकांचा प्लॅन ठरला, डावपेचही ठरले, नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीसांमध्ये महत्त्वाची बैठक

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप बहुतांश उमेदवार बदलणार, नगरसेवकांची धाकधूक वाढली!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.