Maharashtra second lockdown : वडेट्टीवार यांची मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा, प्रवाशांची विभागणी होणार

Maharashtra second lockdown: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

Maharashtra second lockdown : वडेट्टीवार यांची मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा, प्रवाशांची विभागणी होणार
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 11:27 AM

नागपूर : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाचे दररोज 35 ते 40 हजार रुग्ण वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. गर्दी कशी कमी होईल, यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी त्यांना मुंबई लोकलबाबत प्रश्न विचारला असता, मुंबई लोकल बंद होणार नाही, लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. (Vijay Wadettiwar statement on Mumbai Local he said local service not stopped by government)

विजय वडेट्टीवार सध्या नागपुरात आहेत. नागपुरातील रुग्णवाढ चिंतेची असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. 25 वर्षांच्या आतील तरुणांना संसर्ग होत आहे. इतकंच नाही तर लहानग्यांनाही कोरोना होत असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. रुग्णवाढ होत असताना थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे 80 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत, असं त्यांनी नमूद केलं.

मुंबई लोकल बंद नाही, पण विभागणी

मुंबई लोकल बंद होणार नाही, पण प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. लोकल बंद होणार नाही पण निर्बंध लागतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

लॉकडाऊन नाही, पण निर्बंध

लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही. निर्बंध लागतील पण लॉकडाऊन नाही. रुग्णसंख्या वाढत असली तरी बेड कसे वाढतील याकडे लक्ष आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. माझं आवाहन आहे, रक्तदान करा, ते श्रेष्ठदान आहे, नागपूरकरांनी नागपूरकरांचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करा, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं.

भाजपचा आमदार वाचवण्यासाठी प्रयत्न

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप झाले त्यासंदर्भात निवृत्त न्यायाधीश यांची चौकशी लावली आहे, चौकशी नंतर सत्य बाहेर येईल. राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात केवळ वावड्या उठवल्या जात आहेत. हे भाजपचे केवळ त्यांचे आमदार वाचविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आहेत. राज्यात लॉकडाऊन लावले जाणार नाही, नियम अधिक कडक केले जातील. राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. लोकांनी मोठ्या संख्येना रक्त पुरवठा करावं, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं.

नियोजन काहीसं चुकलंच

रुग्ण मोठ्या संख्येने निघत आहेत, तरी 80 टक्के लोकं सिमटन्स नसलेले आहेत. राज्याकडे आहेत त्या साधनांच्या आधारे परिस्थिती वर मात करण्याचे प्रयत्न आहेत. नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त 65 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, अधिक निधी लागला तरी आम्ही देऊ नियोजन काहीसं चुकलंच, रुग्ण मोठ्या संख्येने निघतील असं वाटलं नव्हतं, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! नवीन वर्षात लोकल सुरु करता येणार, वडेट्टीवारांना विश्वास

Mumbai Local train Update : लोकल सुरु व्हावी ही मुख्यमंत्र्यांची इच्छा, येत्या दहा दिवसात निर्णय, वडेट्टीवारांची घोषणा

(Vijay Wadettiwar statement on Mumbai Local he said local service not stopped by government)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.