Devendra Fadnavis : नावावर एकही वाहन नाही; 62 लाखांचे कर्ज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती श्रीमंत? इतकी आहे संपत्ती?

Devendra Fadnavis Wealth : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणाची दिशाच पालटून टाकली आहे. त्यांच्या पुढाकाराने राज्यात महायुतीचे सरकार आले आणि ते आता एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरं पण जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांची इतकी आहे संपत्ती?

Devendra Fadnavis : नावावर एकही वाहन नाही; 62 लाखांचे कर्ज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती श्रीमंत? इतकी आहे संपत्ती?
फडणवीस यांच्याकडे इतकी संपत्ती
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 11:58 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणाची दिशा पालटली. सर्वात अगोदर महाविकास आघाडीचा अचंबित करणारा प्रयोग राज्यात झाला. तर त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजप नेतृत्वात महायुती सरकार आणून दाखवले. त्यांच्या पुढाकाराने राज्यात दोन पक्ष फुटले आणि महायुती सरकार एकत्रितपणे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत त्यांनी शपथपत्र दाखल केले. त्यानुसार फडणवीस कुटुंबाकडे 13 कोटींची संपत्ती आहे.

फडणवीस 13 कोटींचे मालक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि अन्य तपशील जाहीर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 13 कोटी 27 लाख 47 हजार 728 रुपये इतकी संपत्ती आहे. फडणवीसांच्या आयटी रिटर्न फॉर्म नुसार 2023-24 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 79 लाख 30 हजार 402 रुपये इतके आहे. तर 2022-2023 मध्ये हा आकडा 92 लाख 48 हजार 094 रुपये इतके होते. फडणवीस यांनी पत्नी अमृता यांची संपत्ती 6 कोटी 96 लाख 92 हजार 748 रुपये तर मुलगीची संपत्ती 10 लाख 22 हजार 113 रुपये असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

फडणवीस यांची इतकी गुंतवणूक

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे 23 हजार 500 रुपये रोख रक्कम तर पत्नी अमृता यांच्याकडे 10 हजार रुपये रोख रक्कम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बँक खात्यात 2 लाख 28 हजार 760 रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख 43 हजार 717 रुपये आहेत. फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत, विमा यात 20 लाख 70 हजार 607 रुपये गुंतवले आहेत. त्यांची पत्नी अमृता यांनी शेअर, म्यूचल फंड आदी मध्ये मिळून 5 कोटी 62 लाख 59 हजार 031 रुपये गुंतवणूक केले आहेत

फडणवीस यांच्याकडे सोने किती?

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्याकडे 450 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत 32 लाख 85 हजार इतकी आहे. तर पत्नी अमृता यांच्याकडे 65 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे 4 कोटी 68 लाख 96 हजार रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्या नावावर 62 लाखांचे कर्ज आहे. तर त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.