“…पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते; वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी वर्मावरच घाव घातला”

एका माणसाने देशाला घटना दिला, मग एवढी मोठी जनता बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवू शकत नाही का असा सवाल करत , ते म्हणाले की, मी घटना बचाव करणार असं म्हणणार नाही तर घटनेचं संरक्षण मीच करणार असं ठणकावूनही त्यांनी यावेळी सांगितले.

...पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते; वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी वर्मावरच घाव घातला
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 9:05 PM

नागपूर : महाविकास आघाडीला राज्यातील सत्तेतून बाहेर पडावे लागल्यानंतर औरंगाबादनंतर मविआची ही आजची दुसरी सभा होत आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये ही सभा होत असल्याने या सभेकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. यावेळी उद्धव ठाकरे बोलताना म्हटले की, यावेळी मला जुने दिवस आठवले, जेव्हा आम्ही एकत्र नव्हतो. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना समारोसमोर होते. त्यानंतर महाविकास आघाडी जन्माला आली आणि त्यावेळी आम्ही कर्जमुक्त करुन दाखवलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि शिंदे-फडणवी सरकारवर घणाघात करताना त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

यावेळी ते म्हणाले की, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ही आनंदाची गोष्ट असली तरी पण हा पुरस्कार कुणाच्या हस्ते देण्यात आला? असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावलया आहे.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी नागरिकांची जमलेली गर्दी पाहून ते म्हणाले की, आज एवढी लोकं जमली आहेत, पण आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचा गिऱ्हाईक आणि सत्ताधाऱ्यांच्या मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे अशी टीकाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा सादताना आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना त्यांनी संविधानावर घाला घालण्याचे काम भाजप करत असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या भूमीत बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं.

ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. मात्र त्याच भारताला आता आणि भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचं काम भाजपने सुरु केल्याची टीकाही त्यांनी केली.

एका माणसाने देशाला घटना दिला, मग एवढी मोठी जनता बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवू शकत नाही का असा सवाल करत , ते म्हणाले की, मी घटना बचाव करणार असं म्हणणार नाही तर घटनेचं संरक्षण मीच करणार असं ठणकावूनही त्यांनी यावेळी सांगितले.

दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते असं म्हणते त्यांनी राज्यातील आणि देशातील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचा गिऱ्हाईक आणि सत्ताधाऱ्यांच्या मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो असं म्हणत त्यांनी भाजप आणि राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.