महाविकास आघाडी कार्यकाळ पूर्ण करेल, Vijay Vadettiwar यांनी घेतला विरोधकांचा चिमटा
महाविकास आघाडीचं सरकार राज्यात त्यांचा कार्यकाळी पूर्ण करेल, असा विश्वास राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. राज्य सरकार अस्तिर करण्याचे प्रयत्न झाले. पण, ते स्थिर राहून कार्यकाळ पूर्ण करेल, असंही ते म्हणाले.
नागपूर : राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आज नागपुरात गुढी उभारली. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत असताना यंदा मास्कमुक्त गुढीपाडवा साजरा करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. गेल्या दोन व वर्षांपासून राज्यात कोरोनाचे निर्बंध (Nirbandh) होते. सण साजरा करताना बंधन लादली जात होती. यंदा ही बंधनं संपुष्ठात आलीत. मास्क मुक्ती केली नाही, निर्बंध मुक्त केलेत, असंही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं. मास्क घालणे ऐच्छिक आहे. मास्क न घालणे हे संकटाला आमंत्रण देणारं आहे. बंधन नसली तरिही गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा. आज चांगला दिवस आहे. सगळं शुभ शुभ व्हावं, सत्ताधारी आणि विरोधकांसाठी येणारं वर्ष शुभ शुभ जावं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल, असं वडेट्टीवार म्हणाले.
सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न
कोरोनामुळं दोन वर्षे विकासाला गती देता आली नाही. या काळात सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. पुढचे अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार राहील. असंच मुख्यमंत्र्यांना वाटतंय. हे राज्य समतेचं बंधुत्त्वाचं राज्य रहावं. फोन करुन लोक निर्बंध कधी उठतील असं लोक विचारायचे. आज निर्बंध मुक्त झालोय याचा आनंद आहे. मास्क वापरणे, आरोग्य जपणे यातंच सर्वांच हित आहे, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
सरकार कार्यकाळ पूर्ण करेल
गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न झाला. पण, तिन्ही पक्षांचं सरकार योग्य पद्धतीनं सुरू आहे. विरोधक हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करतात. पण, अद्याप त्यांना यश आलं नाही. ते येणारही नाही. कारण आता हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, अशा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात त्यांचा कार्यकाळी पूर्ण करेल, असा विश्वास राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. राज्य सरकार अस्तिर करण्याचे प्रयत्न झाले. पण, ते स्थिर राहून कार्यकाळ पूर्ण करेल, असंही ते म्हणाले.