Video : Rajesh Tope | संभाजी राजेंबद्दल महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, राजेश टोपे यांची नागपुरात माहिती

अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघात विकास व्हायला हवा. सलील देशमुख जबाबदारीने काम करतायत. सलील देशमुख यांना सर्व मंत्री सहकार्य करत आहेत. अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत काटोल मतदार संघातील विकास थांबायला नको. काटोल मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Video : Rajesh Tope | संभाजी राजेंबद्दल महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, राजेश टोपे यांची नागपुरात माहिती
संभाजी राजेंबद्दल महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, राजेश टोपेImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 11:41 AM

नागपूर : नागपूर : आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे हे आज नागपुरात आहेत. राजेश टोपे म्हणाले, शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक भागातील पक्ष संघटनेला वेळ देतोय. इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्न सोडवण्यावर भर राहील. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं. आम्ही सर्वच शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचे आहेत. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत आदर आहे. पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचे (NCP) आहेत. त्यांना लोकसभेची (Lok Sabha) उमेदवारी दिली होती. त्यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याशी प्रेमाचे संबंध आहेत. यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.

पाहा व्हिडीओ

काटोल मतदारसंघाचा विकास व्हायला हवा

राजेश टोपे यांनी सांगितलं की, अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघात विकास व्हायला हवा. सलील देशमुख जबाबदारीने काम करतायत. सलील देशमुख यांना सर्व मंत्री सहकार्य करत आहेत. अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत काटोल मतदार संघातील विकास थांबायला नको. काटोल मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

आशिष जैसवाल हाडाचा कार्यकर्ता

आशिष जैसवाल यांनी विकासकामांसाठी कमी निधी मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राजेश टोपे म्हणाले, शिवसेना आ. आशिष जैसवाल हाडाचा कार्यकर्ता आहे. मेहनती आहे. त्यांच्या मतदारसंघाचा विकास व्हायलाच हवा. ही महाविकास आघाडीची जबाबदारी आहे. आम्ही सर्व मिळून आशिष जैसवाल यांच्या मतदारसंघाचा विकास करुन दाखवू, असंही टोपे म्हणाले.

लसीकरण झाल्यानं कोरोनाची भीती नाही

कोरोनाचा आजचा आकडा 254 नवीन रुग्ण आहेत. रिकव्हरी 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोवीडची चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही. राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही. कोरोना रुग्ण वाढत नाही. लसीकरण चांगलं झालंय. ॲक्टिव्ह रुग्ण 1950 आहेत. सध्या हा फार मोठा विषय नाही. गर्दी करतायत. राजकीय मेळावे करतात. तरीही कोरोना रुग्ण अपेक्षित वाढत नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. चौथ्या लाटेची सुतराम शक्यता वाटत नाही. बुस्टर डोजबाबत केंद्राच्या सूचना आहे. त्यानुसार बुस्टर डोज देतोय. ॲटीबॉडीजची टेस्ट करुन लोक बुस्टर बाब निर्णय घेत आहेत.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.