नागपूरमध्ये 180 निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर, मेयो रुग्णालयात रुग्णसेवेवर परिणाम
नागपूरच्या मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आम्हाला नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली आहे. (mayo hospital resident doctors on mass leave covid patient)
नागपूर : सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे निर्बंध शिथील करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय. या अनलॉकला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. नागपूरमध्येही कोविड सेंटर्समधील अनेक बेड रिकामे आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन नागपूरच्या मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी (Mayo Hospital resident doctors) आम्हाला नॉन कोविड रुग्णांवर (Non Covid patient) उपचार करण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली आहे. या मागणीला घेऊन हे डॉक्टर्स मागील दोन दिवसांपासून सामूहिक रजेवर आहेत. डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आजचा तिसरा दिवस आहे. ( Mayo Hospital resident doctors on mass leave demanding allow them to treat Non Covid patient)
डॉक्टर दोन दिवसांपासून सामूहिक रजेवर
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे अनेकांनी शुकटेचा निश्वास सोडला आहे. या कालावधीदरम्यान मागील कित्येक महिन्यांपासून नागपूरच्या मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर कोविड रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र, आता रुग्णसंख्या कमी झाली आहे, त्यामुळे आतातरी नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी येथील निवासी डॉक्टरांनी केली आहे. याच मागणीसाठी मेयो रुग्णालयातील डॉक्टर्स सामूहिक रजेवर आहेत. मागील दोन दिवसांपासून डॉक्टर रजेवर आहेत. रजेवर असणाऱ्या डॉक्टर्सची एकूण संख्या 180 च्या घरात आहे.
रजेमुळे रुग्णसेवेवर परिणाम
दरम्यान, मेयो रुग्णालयातील एकूण 180 डॉक्टर्स रजेवर असल्यामुळे येथे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. याच कारणामुळे डॉक्टरांच्या मागण्यांवर गंभीरपणे विचार करुन तो लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी केली जात आहे.
नागपूरमध्ये मृत्यूसंख्या 10 च्या खाली
नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. जिल्ह्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. आज कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10 च्या खाली आली आहे. आज दिवसभरात येथे फक्त आठ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात नागपुरात 190 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. तसेच आज दिवसभरात 529 जणांनी कोरोनावर मात केली.
भाईचा बड्डे पडला महागात, 5 मित्रांचे पोलिसांनी वाजवले बाराhttps://t.co/a0Sm3ulXdF#BuldhanaPolice #Buldhana #Crime #BuldhanaCrime #crimenews
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2021
इतर बातम्या :
पेट्रोल पंपावर किरकोळ वाद, गुंडाचा कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला, नागपूरमध्ये खळबळ
क्वारंटाईन सेंटरमधून 23 पंखे, नळाच्या तोट्या, बल्ब पळविले; चहा विकणाऱ्या भामट्याला बेड्या
वर्ध्यात म्युकरमायकोसिसचे 81 रुग्ण, कोरोना नसलेल्यांनाही म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने चिंता वाढली
( Mayo Hospital resident doctors on mass leave demanding allow them to treat Non Covid patient)