मेडिकलच्या दंत महाविद्यालयात विद्रृप चेहऱ्यांवर होणार उपचार, नागपुरात इम्प्लांट किट्स लवकरच उपलब्ध
कोरोनानंतर म्युकरमायकोसीस हा आजार पुढं आला. यामुळं काहींचे चेहरे विद्रूप झाले. म्युकरमायकोसीसच्या 71 रुग्णांच्या जबड्याचा वरचा भाग काढून उपचार करण्यात आले. पण, विद्रृप चेहरे दुरुस्त करण्यासाठी इम्प्लांटची आवश्यकता होती. सरकारनं यासाठी रुग्णांच्या उपचारासाठी सत्तर लाख रुपये दिले. नागपुरातील दंत महाविद्यालयात इम्प्लांट किट्स खरेदी करण्यात आली. आता लवकरच उर्वरित रुग्णांवर उपचार होणार आहेत.
नागपूर : म्युकरमायमोसीस या आजारात रुग्णांचे जबडे आणि डोळे काढावे लागतात. दंत महाविद्यालयामध्ये (Medical Dental College) 71 रुग्णांचे जबडे काढण्यात आले. त्यामुळं त्यांचा चेहरा विद्रृप झाला. ही विद्रृपता दूर करण्यासाठी इम्प्लांट आवश्यक होते. गरीब रुग्णांसाठी हा खर्च परवडण्याजोगा नव्हता. या रुग्णांवर इम्प्लांट करण्यासाठी दंत महाविद्यालयाने विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे 75 लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव सादर केला. त्यामध्ये इम्प्लांट किट्सची आवश्यकता व खर्चाबाबत माहिती देण्यात आली. या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी (Divisional Commissioner ) गंभीरतेने घेतले. शासनाकडे निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. इम्प्लांट किट्सच्या खरेदीसाठी (Procurement of Implant Kits) शासनाकडून दंत महाविद्यालयाला 70 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. दंत महाविद्यालयाकडून किट्स खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जबड्याशी संबंधीत आजारांचे निदान
दंत महाविद्यालयाने गेल्या वर्षी जानेवारी ते जून या महिन्यांत दातांशी संबंधित रुग्णांवर उपचार केले. यामध्ये पन्नास रुग्णांच्या जबड्याचा वरील भाग काढण्यात आला. बारा रुग्णांचे झायकोमॅटिक बोन काढण्यात आले. तसेच आयसीयूत भरती 20, वॉर्डातील 35 व गृहविलगीकरणातील 49 रुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी पंचावन्न रुग्ण मधुमेहाने ग्रस्त होते. इतरांना स्टेराइडमुळं मधुमेह झाला होता. या रुग्णांमध्ये दात व जबड्यांशी संबंधित आजारांचे निदान झाले. या बहुतेक रुग्णांचे वय 22 ते 65 वर्षे होते. आता एकूण 71 रुग्णांवर उपचार करण्यात येतील.
खासगीत उपचाराचा खर्च मोठा
जबडा काढल्याने विद्रृप झालेल्या रुग्णांवर इम्प्लांट लावण्यासाठी पाच ते सात लाख रुपयांचा खर्च येतो. शासकीय रुग्णालयात यावर एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च लागतो. एका रुग्णाच्या उपचारासाठी चार किट्सची आवश्यकता असते. निधीच्या अभावाने या किट्स मागविण्यात आल्या नव्हत्या. पण, आता निधी उपलब्ध झालाय. त्यामुळं रुग्णांना इम्प्लांट बसविणे शक्य होणाराय. कोरोनानंतर म्युकरमायकोसीस हा आजार पुढं आला. यामुळं काहींचे चेहरे विद्रूप झाले. म्युकरमायकोसीसच्या 71 रुग्णांच्या जबड्याचा वरचा भाग काढून उपचार करण्यात आले. पण, विद्रृप चेहरे दुरुस्त करण्यासाठी इम्प्लांटची आवश्यकता होती. सरकारनं यासाठी रुग्णांच्या उपचारासाठी सत्तर लाख रुपये दिले. नागपुरातील दंत महाविद्यालयात इम्प्लांट किट्स खरेदी करण्यात आली. आता लवकरच उर्वरित रुग्णांवर उपचार होणार आहेत.