Vidarbha Damage | विदर्भात दिवसा पारा, रात्री वारा; वाशिममध्ये आंबा बागेचे, तर गोंदियात भाजीपाल्याचे नुकसान
विदर्भात उन्हाचा पारा दिवसा 42 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला. पण, रात्री वादळवारा सुटला. त्यामुळं तापमानात प्रचंड घट झाली. वाशिम, गोंदियात वादळानं पिकांचं नुकसान (Damage) केलंय. गोंदियात पर्जन्यमान झालं. त्यामुळं भाजीपाल्याचं (Vegetables) नुकसान झालंय.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चागंलाच वाढला. काल दिवसा चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पण, रात्री जोरदार वादळासह काही ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाली. नागपुरात सुसाट वारा सुटला. काही रस्त्यांवरून चालणे कठीण झाले होते. वादळामुळं समोरच काही दिसत नव्हतं. शहरात बरेच रस्ते झाले असले तरी काही भागात अद्याप रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. नरसाळा-दिघोरी रस्त्याची तर गेल्या चार वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. रस्ता होणार होणार म्हणता अजून काही झालेला नाही. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर काल वादळामुळं धुळीनं प्रवाशांना चांगलेच त्रस्त केलं. गुरुवार बाजार रस्त्यावर भरतो. या बाजाराची वाताहत झाली. वादळवाऱ्यात संपूर्ण रस्ता धुळीने माखला होता. शुक्रवारीही ढगाळलेले वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात उन्हाचा पारा दिवसा 42 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला. पण, रात्री वादळवारा सुटला. त्यामुळं तापमानात प्रचंड घट झाली. वाशिम, गोंदियात (Gondia) वादळानं पिकांचं नुकसान (Damage) केलंय. गोंदियात पर्जन्यमान झालं. त्यामुळं भाजीपाल्याचं (Vegetables) नुकसान झालंय.
वाशिममध्ये आंबा बागेचे नुकसान
काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने वाशिम येथील सुनील लोणसुने यांच्या आंबा बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने पंचनामे करावे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मालेगाव शहरासह काही गावामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला.
गोंदियात भाजीपाला पिकांचे नुकसान
गोंदिया जिल्ह्यात रात्री अचानकपणे वातावरणात बद्दल झाला. अवकाळी पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले. जोरदार ढगांच्या गळगळाटासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी गारांचा पाऊस सुद्धा बरसला. या अवकाळी पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळ्याच्या त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना गर्मी पासून दिलासा मिळाला. मात्र, शेतकऱ्यांच्या फळबाग, भाजीपाला यांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.